पुणे : पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी दत्तात्रय पायगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शुक्रवारी (दि. १३) गुलटेकडी मार्केट यार्ड येथील बाजार समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. उपसभापती सारीका हरगुडे यांच्या पदाचा आठ महिन्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी सभापती दिलीप काळभोर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. (Pune Market Committee)
शुक्रवारी झालेल्या बैठकीत उपसभापतींची बिनविरोध करण्यात आली. या बैठकीत उपसभापती निवडीसाठी सुचक म्हणून नितीन दांगट तर अनुमोदन अनिरूध्द भोसले यांनी केले. यावेळी, बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर, सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी काम पाहिले. (Pune Market Committee)