मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदाचा लागलेला कस..., सात थरांचा थरथराट..., ढोल-ताशांसह ध्वजाची सलामी..., हजारो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव..., कलाकारांची हजेरी..., मराठी-हिंदी गाण्यांवर ठेका धरत पावसाच्या सरी अंगावर झेलत नाचणारी तरुणाई... अन् रस्त्या-रस्त्यांवर घुमलेला गोविंदा रे गोपाळाचा गजर, अशा उत्कंठावर्धक वातावरणात मंगळवारी शहरात दहीहंडीचा उत्सव पार पडला. दरम्यान, सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी रात्री 9 वाजून 7 मिनिटांनी कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुपच्या गोविंदांनी सात थर लावून फोडली. तर, हुतात्मा बाबू गेनू तरुण मंडळाची दहीहंडी रात्री 9 वाजून 59 मिनिटांनी कसबा पेठेतील शिवतेज ग्रुपच्या गोविंदांनी सात थर लावून फोडली. शहरासह उपनगरांमध्ये सायंकाळपासून दहीहंडीच्या तयारीला वेग आला होता.
सायंकाळी सहाच्या ठोक्याला दहीहंडी फोडून गोविंदा पथके शहरासह उपनगर व जिल्ह्यातील मंडळांची दहीहंडी फोडण्यासाठी रवाना झाली. सायंकाळी सातनंतर शहरांतील रस्ते गोविंदामय होण्यास सुरुवात झाली. कलाकारांची उपस्थिती आणि गोविंदांना बघायला आणि पाठिंबा द्यायला जमलेल्या प्रचंड जनसमुदायामुळे उत्सवाचा रंग चढतच गेला. यंदा थरांच्या विक्रमापेक्षा सुरक्षा आणि परंपराला प्राधान्य देत केवळ सात थरांचाच उत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले होते. दरम्यान, शहरांसह उपनगरांत दहीहंडीच्या प्रसिद्धीचे लोणी मटकाविण्यासाठी शहरातील विविध मंडळांमध्ये स्पर्धा रंगली होती.
शहराच्या मध्यवर्ती भागातील हुतात्मा बाबू गेनू तरुण मंडळ आणि सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी उसळली होती. सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी रात्री 9 वाजून 7 मिनिटांनी कसबा पेठेतील राधेकृष्णच्या गोविंदांनी फोडली. हुतात्मा बाबू गेनू तरुण मंडळाची दहीहंडी रात्री 9 वाजून 59 मिनिटांनी कसबा पेठेतील शिवतेजच्या गोविंदांनी फोडली. दहीहंडी फोडल्यानंतर साउंडसिस्टीमवर ठेका ठरत मोठा जल्लोष केला. गोविंदांना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने रोपची व्यवस्था करण्यात आली होती. शहरात सायंकाळी नऊनंतरच बहुतेक दहीहंडी उत्सव मंडळांनी आपली दहीहंडी फोडायला सुरुवात केली. अनेक दहीहंडी मंडळांनी उत्सवादरम्यान लाऊडस्पीकरसह ढोल-ताशा पथकांचे स्थिर वादनही ठेवले होते.
कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता, धायरी, हडपसर, कात्रज, बाणेर, औंध, शिवाजीनगर, चंदननगर, वडगाव शेरी, हिंजवडी या उपनगरांमधील मंडळांनी मोठ्या प्रमाणात साउंडसिस्टीम लावले होते. मंडळांच्या ठिकाणी बेधुंद नाचणार्या तरुणाईवर डोळे दीपवून टाकणारे विविधरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठूी इंदापूर, भोर