

Pune News: चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीकडून घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने फसवून घेण्यात आले. तीन लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मांजरी खुर्दमधील 38 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 43 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची मुलगी दहावी इयत्तेत आहे. त्यांच्या घरासमोरच एक महिला राहते. तिलाही 14 वर्षांची मुलगी आहे. फिर्यादी गावी गेल्या असता, त्यांची मुलगी आणि मुलगा दोघेच घरात होते. तेव्हा समोरील महिलेने आणि तिच्या मुलीने फिर्यादीच्या मुलीला आमची इंन्ट्राग्रामवरून एका महिलेची ओळख झाली असून, ती मराठी आणि हिंदी चित्रपटांत कामाची संधी देणार आहे.
तुलाही चित्रपटात काम मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर तिच्याकडून घरातील वडिलांना लागलेल्या भिशीची एक लाख 70 हजारांची रोकड काढून घेतली. तसेच, फोन पेद्वारे एकूण 42 हजारही घेतले. घरातील पैसे संपल्यावर तिच्याकडून घरात असलेले मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठीही घेण्यात आली. फिर्यादी घरी आल्यावर तिला घरात रोकड व दागिने न दिसल्याने तिने मुलीला विचारणा केली, तेव्हा ही घटना उघडकीस आली.