Maharashtra politics | अजित पवार, मुश्रीफांसह २० जणांची उमेदवारी निश्चित

राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
NCP Ajit Pawar faction assembly election candidate list
अजित पवार, मुश्रीफांसह २० जणांची उमेदवारी निश्चितfile photo
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या वीस उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा त्यात समावेश आहे. मात्र, त्याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली नाही.

पुण्यात राष्ट्रवादी काँगे्रस अजित पवार गटाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. महायुतीतील घटक पक्ष असणार्‍या राष्ट्रवादी अजित पवार गटाने इतर मित्र पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली आहे. अजित पवार गटाच्या वाट्याला येणार्‍या ज्या जागा आहेत त्यावर बैठकीत चर्चा झाली. ज्या वीस उमेदवारांची तिकिटे निश्चित करण्यात आली, त्यातील बहुतांश त्या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. बारामतीतून अजित पवार लढणार की नाही? याबद्दल शंका उपस्थित केली जात होती; पण या बैठकीत अजित पवार यांचे नाव बारामतीतून निश्चित करण्यात आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातील हिट अँड रनप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडलेले वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारी निश्चित झालेल्यांची नावे (मतदारसंघ, संभाव्य उमेदवार)

बारामती : अजित पवार, कागल : हसन मुश्रीफ, येवला : छगन भुजबळ, आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील, परळी : धनंजय मुंडे, दिंडोरी : नरहरी झिरवळ, रायगड : आदिती तटकरे, अहमदनगर : संग्राम जगताप, खेड : दिलीप मोहिते-पाटील, अहेरी : धर्मरावबाबा आत्राम, कळवण : नितीन पवार, इंदापूर : दत्ता भरणे, उदगीर : संजय बनसोडे, पुसद : इंद्रनील नाईक, वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटील, मावळ : सुनील शेळके, अमळनेर : अनिल पाटील, जुन्नर : अतुल बेनके, वडगाव शेरी : सुनील टिंगरे, पिंपरी : अण्णा बनसोडे.

पुण्यात आठ मतदारसंघांत शरद पवार गटाकडून ४१ जण इच्छुक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण 41 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक नऊजण इच्छुक आहेत. दोन ते अडीच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही विधानसभेसाठी शहरातील हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरूड, कसबा या आठही मतदारसंघांतून इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. सर्व 41 इच्छुकांच्या मुलाखती लवकरच घेण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

NCP Ajit Pawar faction assembly election candidate list
देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांपूर्वी राज्यपालपदाची ऑफर दिली होती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news