Pune : हातवे येथील खूनप्रकरणी आरोपीला पकडले

आरोपीची गुन्ह्याची कबुली राजगड पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची संयुक्त कारवाई
Murder in the River Basin
नदीपात्रातील खून Pudhari File Photo
Published on
Updated on

गुंजवणी नदीपात्रामध्ये संशयास्पद बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे. हा मृत्यू अपघात नसून खूनच असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. चौकशीनंतर अखेर राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपत गेनबा खुटवड (वय ५२ रा. हातवे खुर्द ता. भोर ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ही घटना हातवे ( ता. भोर ) येथील गुंजवणी नदी बंधारा पात्रात रविवारी ( दि. २२ ) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी स्वप्निल उर्फ बंटी ज्ञानोबा खुटवड (वय ३० रा. हातवे खुर्द ता. भोर ) याच्यावर खून केल्या प्रकरणी सोमवारी ( दि. २५ ) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगड पोलिस आणि पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त कारवाई करून आरोपीला जेरबंद करून अटक केली आहे.

गुंजवणी नदीपात्रामध्ये गणपत खुटवड आणि स्वप्निल उर्फ बंटी खुटवड यांच्यात वादावादी सुरू असताना स्वप्निल शेलार हा त्यांच्यातील वाद मिटवण्याच्या उद्देशाने गेला असता आरोपी स्वप्नील खुटवड याने स्वप्निल शेलारला येथून 'शून्य मिनिटात येथून निघ' नाहीतर तुझ्याकडे बघावे लागेल: अशी धमकी दिल्याने शेलार येथून निघून गेला होता. यानंतर स्वप्नील उर्फ बंटी खुटवड याने गणपत खुटवड यांच्या डोक्यात व डोळाचे भुवईच्या वरती जखमा करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संदीप अरूण खुटवड यांनी याबाबत राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक अजित पाटील, उपनिरीक्षक संजय ढावरे, पोलीस हवालदार सागर कोंढाळकर, नाना मदने, मयूर निंबाळकर, अक्षय नलावडे, समीर भालेराव तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले. आरोपीने कोणत्या कारणावरून खून का केला तसेच त्याच्याबरोबर अन्य साथीदार होते का? याचा देखील तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news