बारामती : धक्कादायक! सावत्र पित्याकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Pune News : नात्याला काळिमा फासणारी घटना; सावत्र पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
 शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले.
शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले.File Photo
Published on
Updated on

बारामती : शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. यातून मुलीला दिवस गेल्यानंतर ही गंभीर घटना उघडकीस आली.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या आईशी आरोपीने दुसरा विवाह केला आहे. सध्या हे कुटुंब शहरात एकत्र राहते. मुलीची आई पहाटे उठून अंगण साफ करण्यासाठी जात होती. याचा फायदा घेत जुलै २०२४ पासून सावत्र बाप अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता. जुलैपासून ते सप्टेंबरपर्यंत त्याने दोन-तीनदा तिच्याशी शारिरिक संबंध केले. त्यातून ही १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. याबाबत तू कोणाला काही सांगितले तर तुझ्या आईला व तुला जीवे मारून टाकीन. अशी धमकी तो पीडितेला देत होता. पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले.
ठाणे : गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटांत हाणामारी तरीही पोलिसात तक्रार नाही

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news