आम्ही निवडणूक घेऊ शकलो असतो... पण...! : अजित पवार | पुढारी

आम्ही निवडणूक घेऊ शकलो असतो... पण...! : अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘आमच्याकडे बहुमत असतानाही आम्ही टोकाची भूमिका घेतली नाही. आम्हाला त्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक घेता आली असती, पण आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही. ते महत्त्वाचं पद आहे. सर्वांनीत्या पदाचा आदर केलाच पाहिजे. राज्यपाल महोदयांनी काही घटनात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यासंदर्भात माहितीकरून घेऊ. पुढील अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होईल हे सरकारने आधीच जाहीर केले आहे’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे : ‘भय इथले संपत नाही’, बिबट्या पाठ सोडेना!

विधीमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता, ‘पुढील अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होईल असे राज्य सरकारने या आधीच जाहीर केले आहे. त्याआधी घटना तज्ज्ञांशीही चर्चा केली जाईल’, असे त्यांनीस्पष्ट केले. ‘आम्ही काही प्रमुख लोकं पुन्हा राज्यपाल महोदयांची भेट घेऊ. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. त्यात काय घटनाबाह्य आहे, हे आम्हीही समजून घेऊ. हातात आणखी दोन महिने आहेत. आम्ही घटना तज्ज्ञांचाहीसल्ला घेऊ’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे रेल्वे स्थानकातून सांगा बाहेर कसं पडायचं?

चंद्रकांत पाटलांना टोला

अध्यक्षपदावरून झालेल्या टीका टिप्पणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘राज्य सरकारने समजूतदारपणा दाखवायला पाहिजे होता’, अशी टीका केली होती त्याकडे लक्ष वेधले असता, ‘राज्यपाल महोदयांनी सांगूनही निवडणूक घेतली असती, तर तो असमजूतदार पणा झाला असता…पण आता काहीजणांना हे कळत नसेल तर…’ अशा शब्दात त्यांनी टोला लागावला. ‘आम्ही पुन्हा राज्यपालांना भेटून सांगू, त्यांनीही माहिती घ्यावी. आम्हालाही त्यांचा आदर ठेवूनच राज्य चालवायचं आहे’, असे पवार म्हणाले.

…आणि अजित पवार भडकले

महाआघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतल्याच्याप्रश्नी बुधवारी राष्ट्रवादी कँाग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका कार्यक्रमात टिप्पणी केली होती, त्यासंदर्भात पत्रकारांनी छेडताच अजित पवार भडकले. ’तो सर्वस्वीमाझा अधिकार आहे. मला वाटेल तेंव्हाच यावर मीबोलेन, विषय संपला’, असे म्हणत त्यांनी काढता पाय घेतला.

‘जेव्हा ज्येष्ठ नेते बोलतात तेव्हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने बोलून गैरसमज पसरवायचे नसतात. ते काय म्हणाले ते तुम्ही ऐकले आहे. मला त्याबद्दल काहीबोलायचे नाही’, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा

आशियाई लिफ्टिंग स्पर्धा : पुण्याच्या चार जणींना सुवर्णपदक

पुणे महापालिका : प्रारुप प्रभाग रचनेतील बदलांना मुहर्त मिळाला

Ross Taylor : न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटर रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा

औरंगाबाद : वऱ्हाडींवर काळाचा घाला, अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार, १४ जण गंभीर जखमी

ATM Cash Withdrawal : नवीन वर्षात मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास भुर्दंड बसणार!

 

Back to top button