वीस वर्षांनी होणार त्रिसदस्यीय प्रभागानुसार महापालिका निवडणूक | पुढारी

वीस वर्षांनी होणार त्रिसदस्यीय प्रभागानुसार महापालिका निवडणूक

नव्या प्रभागाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेची त्रिसदस्यीय प्रभागरचेनुसार निवडणूक तब्बल 20 वर्षांनी होत आहे. फेबु्रवारी 2002 नंतर येत्या वर्षातील निवडणुकीत तीन नगरसेवकांच्या एक प्रभाग असणार आहे.

नव्या रचनेनुसार प्रभाग कसा असेल, त्यांची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.

सध्या 4 सदस्यांनुसार 32 प्रभाग आहेत. त्यात बदल करून तसेच, 128 चे 139 प्रमाणे 11 नगरसेवक वाढल्याने 3 सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यामुळे शहराची संपूर्ण प्रभागरचना पुन्हा बदलली आहे.

परिणामी, प्रभागाचा आकार व सीमा मर्यादित होऊन छोट्या झाल्या आहेत.

शिवसेना प्रमुखांच्या घरात होणार हर्षवर्धन पाटील यांची सोयरिक

प्रभागरचनेच्या कामास उत्तरेकडून सुरुवात करून शेवट दक्षिण भागात केला आहे. त्यामुळे पहिला प्रभाग चिखली की तळवडे आणि शेवटचा प्रभाग सांगवी की दापोडी यांची उत्सुकता लागली आहे.

तसेच, चार सदस्यांचा प्रभाग कोणता होतो. प्रभागरचना कशी केली आहे. नवीन भाग कोणता जोडला किंवा कोणता वगळला आहे, त्याबाबत राजकीय मंडळीसह नगरसेवक व इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

प्रभागाबाबत सर्वच पक्षांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. तसेच, पालिकेचे अधिकारी, जाणकार व अनुभवी व्यक्तींकडून प्रभागरचनेची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सांगली जिल्ह्यातील ३ नगरपंचायतीच्या प्रत्येकी ४ जागांची निवडणूक स्थगित

ओबीसी आरक्षणाबाबत संभ्रम :

निवडणुक अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि 50 टक्के महिला असे आरक्षण आहे. एससीसाठी 22 व एसटीसाठी 3, ओबीसीसाठी 38 आणि सर्वसाधारण खुला गटासाठी 76 जागा असणार आहेत.

एकूण 139 जागेत महिलांसाठी 70 जागा असतील. ओबीसी आरक्षणाबाबत अद्याप संभ्रम असून, त्याबाबत स्पष्ट सूचना नाहीत. ओबीसी आरक्षण नसल्यास सर्वसाधारण खुला गटासाठी 114 असतील.

कौतुकास्पद : हिंगोली पोलीसांनी उभारलं चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन

सन 2002 नंतर त्रिसदस्यीय निवडणूक

महाापालिकेची फेबु्रवारी 2002 ला त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली होती. त्यानंतर 20 वर्षांने म्हणजे फेबु्रवारी2022 ला त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणूक होत आहे.

मात्र, त्या वेळेत 35 प्रभागात 105 नगरसेवक होते. यंदा 46 प्रभागात 139 नगरसेवक असणार आहेत.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

सतत प्रभागरचनेत बदल

महापालिका निवडणुकीसाठी वारंवार प्रभागरचनेत बदल केला जात असल्याने नगरसेवक तसेच, इच्छुकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या प्रभागासह आजूबाजूच्या भागातही लक्ष द्यावे लागत आहे.

नगरसेवकांना पतीसह किंवा नगरसेविकेला पतीसोबत आणि नातेवाइकांबरोबर काम करत प्रसिद्धी करावी लागत आहे. त्यात नाहक खर्च वाढत आहे.

कायमस्वरूपी प्रभागरचना नसल्याने प्रभागाबाबत भविष्यातील योजना आखताना कसरत करावी लागत आहे.

क्रिप्टोकरन्सीमधील संपत्ती जाहीर करण्यासाठी सरकारकडून मुदत!

पुन्हा भाजपच सत्तेत येणार : शहराध्यक्ष

प्रभागरचना कशीही आणि कितीही सदस्यांची केली तरी, भाजपने त्यानुसार आपली तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे आम्हाला चिंता करायची गरज नाही.

काही जण पक्ष सोडून गेले तरी, त्यांना पर्यायी उमेदवार आम्ही तयार ठेवले आहेत. महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

पुष्पा : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?

महापालिका राष्ट्रवादी पुन्हा ताब्यात घेणार : शहराध्यक्ष

प्रभागरचना करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही. मात्र, प्रभाग कसेही होऊ द्या. भ्रष्टाचारी भाजपला जागा दाखविण्याचा निर्णय नागरिकांनी पक्का केला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात पुन्हा महापालिका येणार आहे. त्या दृष्टीने पक्षाचे शहरात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

Back to top button