प्राथमिक शिक्षणाला ओमायक्रॉनचा खोडा | पुढारी

प्राथमिक शिक्षणाला ओमायक्रॉनचा खोडा

15 डिसेंबरला तरी शाळा सुरू होणार का?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा 

जवळपास पावणेदोन वर्षांपासून शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. यामध्ये माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली.

विद्यार्थ्यांची मानसिकता आणि होणारे शैक्षणिक नुकसान पाहता शाळा ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय 1 डिसेंबरला झाला. त्यालाही आता ओमायक्रॉन या नवीन विषाणूमुळे खोडा बसण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यातील ३ नगरपंचायतीच्या प्रत्येकी ४ जागांची निवडणूक स्थगित

तसेच शाळा सुरू झाल्यानंतर चार महिन्यात विद्यार्थ्यांकडून अभ्यास पूर्ण करून घेण्याचेही आव्हान आहे.गेल्यावर्षी देखील फेब्रुवारीमध्ये प्राथमिक शाळा सुरू केल्या.

त्याचवेळी कोरोनाची दुसरी लाट आली त्यावेळी पुन्हा प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. तेंव्हापासून ते आजतागायत प्राथमिक शिक्षण ऑनलाइन सुरू आहे.

कौतुकास्पद : हिंगोली पोलीसांनी उभारलं चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन

यामध्ये नुकतेच पहिलीच्या वर्गात पाऊल टाकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा आणि शाळेचे वातावरण याचा अनुभव देखील नाही.
अनेक विद्यार्थ्यांपर्यत ऑनलाइन शिक्षण पोहचले नाही.

अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही शाळा ऑफलाइन सुरू व्हाव्यात असे मनापासून वाटत आहे. मात्र, दरवेळी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर पाणी फिरले आहे.

क्रिप्टोकरन्सीमधील संपत्ती जाहीर करण्यासाठी सरकारकडून मुदत!

विद्यार्थ्यांना दोन वर्षाचा शैक्षणिक अभ्यासक्रम शिक्षकांना शिकवावा लागणार आहे. वाचनात कमी पडणार्‍या विद्यार्थ्यांचा नव्याने अभ्यास घ्यावा लागेल.

यामध्ये प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना अक्षर व संख्या ओळख करुन देणे हे आव्हान आहे.

शैक्षणिक वर्ष संपायला चार ते पाच महिने राहिले असून यावेळेत शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

Back to top button