पिंपरी-चिंचवड शहराची स्पोर्ट्स हबच्या दिशेने वाटचाल | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहराची स्पोर्ट्स हबच्या दिशेने वाटचाल

शहरात सर्वत्र राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करणार

पिंपरी : मिलिंद कांबळे : कामगारनगरी, उद्योननगरी तसेच, झपाट्याने वाढत असलेले व राहण्याजोगे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहर ओळखले जाते. शहरात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असून, त्यात भर घातली जात आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी नव्याने क्रीडा धोरण आखण्यात आले. खेळांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी स्पोर्ट्स हबच्या दिशेन वाटचाल करीत आहे. त्या दृष्टीने महापालिका पावले टाकत आहे.

महापालिकेने शहरात बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस कोर्ट, हॉकी स्टेडियम, जलतरण तलाव, सिथेटिंक ट्रॅक, स्केटिंग रिग, फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट आदींचे मैदान, योगा, मुष्टियुद्ध हॉल, व्यायामशाळा तसेच, अण्णासाहेब मगर व मदनलाल धिंग्रा मैदान आहे.

क्रिप्टोकरन्सीमधील संपत्ती जाहीर करण्यासाठी सरकारकडून मुदत!

अनेक प्रभागात नव्याने क्रीडा संकुल निर्माण केले जात आहेत. भोसरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल साकारत आहे. रायफल शूटींग रेंज निर्माण केली जात आहे. मगर स्टेडिमय येथे विविध खेळांचे अद्ययावत स्टेडियम ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारण्यात येणार आहे.

तसेच, मैदान, जलतरण तलाव व इतर क्रीडा सुविधा नसलेल्या प्रभागात त्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. पिंपळे सौदागर येथे स्मार्ट सिटीअंतर्गत क्रीडा सुंकल बांधण्यात येत आहे.

शहरात सायकल ट्रॅक निर्माण करण्यासाठी हरित सेतू उपक्रम हाती घेतला आहे.शहरात आंतराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम विकसित असून, त्यांचे नव्याने नूतनीकरण करण्यात आले आहे.

शिवसेना प्रमुखांच्या घरात होणार हर्षवर्धन पाटील यांची सोयरिक

या मैदानात अधिकाधिक स्पर्धा आयोजन करून आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्याचे ध्येय महापालिकेने ठेवले आहे. कोरोना निर्बंधामुळे विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमीद्वारे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे पावणेदोन वर्षांपासून बंद आहे.

लवकरच ते सुरू करण्यात येणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.टेनिसचे खासगी प्रशिक्षण दिले जात आहे. थेरगावच्या दिलीप वेंगसरकर अ‍ॅकॅडमीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निर्माण होत आहेत.

कबड्डीसाठीही खासगी संघाचे सहाय घेण्यात आले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत खेळांसाठी विविध योजना राबविल्या जाणार आहेत. पालिकेने अद्ययावत सुविधा निर्माण केल्यानंतरही चांगल्या प्रशिक्षकांअभावी खेळाडू घडत नाहीत.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

त्यासाठी खासगी क्लब व प्रशिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. पालिकेने उभारलेल्या सुविधा धूळखात पडू नये म्हणून स्पोर्ट्स क्लब, संस्थांची मदत घेतली जात आहे. पालिका शाळेतील खेळाडूंना प्रोत्साहन मिळून खेळाडू निर्माण होतील, असा दावा पालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवडला स्पोर्ट्स हब करण्याचे नियोजन : आयुक्त

शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम, मैदान, हॉल अशा विविध सुविधा महापालिका निर्माण करीत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धा आयोजन करणार आहे.

नेहरूनगरच्या मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर राष्ट्रीय पुरुष हॉकी स्पर्धेचे 11 डिसेंबरपासून आयोजन केले आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेत आहोत.

शहरात प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र संकुल उभारून त्या-त्या खेळास प्रोत्साहन देऊन प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. त्यासाठी चांगले कोच व क्रीडा संघटना तसेच, खासगी कंपन्यांचे सहाय घेतले जात आहे.

त्या माध्यमातून शहराला स्पोर्ट्स हॅब म्हणून नवीन ओळख देण्याचा प्रयत्न आहे, असे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

जेव्हा चाहत्यांच्या मागणीवर कोहली मैदानात नाचू लागतो (Video)

शहरात खेळाडू वसतिगृहाची गरज

शहरात खेळांच्या अनेक सुविधा आहेत. वाहतुकीचे अनेक साधने उपलब्ध आहेत. मात्र, खेळाडूंसाठी वसतिगृह नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते.

परगावाहून आलेल्या खेळाडूंना नाईलास्तव स्टेडियम, मैदान, हॉलमध्ये किंवा आर्थिक भुर्दंड सहन करून हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागतो. चांगली झोप न मिळाल्याने त्यांची कामगिरी ढासळते.

शहरात खेळाडूंसाठी मध्यवर्ती ठिकाणी चांगले वसतिगृह उभारण्याची मागणी क्रीडा संघटक व प्रशिक्षकांकडून केली जात आहे.

Back to top button