गुटखा बंदी केराच्या टोपलीत | पुढारी

गुटखा बंदी केराच्या टोपलीत

दापोडी परिसरात गुटखा विक्री तेजीत; पोलिसांची डोळेझाक

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : गुटखा आरोग्यास हानिकारक असल्याने राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी गुटखा बंदी केली आहे. तरूण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी गुटखा उत्पादन व विक्रीसाठी सरकारने बंदीचा आदेश काढला.

तरी अंमलबजावणी होत नसल्याने बहुतांश किराणा दुकान व पानटपरीमधून दुपटीच्या किमतीने गुटखा विक्री सुरूच असल्याचे दिसून येत आहे. घोषणेनंतर आता कडक कारवाईची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

शहरासह ग्रामीण भागातील तरुण वर्गात गुटखा खाण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्यामुळे तरुण वर्ग व्यसनाधीन झाल्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी तंबाखू फक्त श्रीमंत व ज्येष्ठ नागरिकच खाताना दिसत होते.

शिवसेना प्रमुखांच्या घरात होणार हर्षवर्धन पाटील यांची सोयरिक

एखादी व्यक्ती ही दुसर्‍या व्यक्तीसमोर असताना तंबाखू खाण्याचे धाडस करीत नव्हते.

आज शालेय विद्यार्थ्यांपासून ते कॉलेजपर्यंत अनेकांच्या खिशात गुटख्याच्या पुड्या दिसून येत आहेत. अनेक तरुण गुटख्याच्या पुड्या तोंडात टाकताना दिसतात.

यामुळे दिसेल त्या ठिकाणी गुटख्याची पिचकारी टाकून स्वच्छ असलेली जागा घाण करतात. प्रशासनाने आतापर्यंत अनेकवेळा बंदी घातली. मात्र, सध्या अनेक ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत आहे.

एका बापाने अशावेळी काय बोलायचं? मुलीच्या लग्नानंतर जितेंद्र आव्हाड झाले भावुक

काही दुकानदार व टपरीधारक खिशात ठेवूनच किंवा दुकानाच्याजवळ येऊन फक्त ओळखीच्या ग्राहकांना गुटखा देतात.

याबाबत ज्येष्ठ नागरिक वामन कांबळे म्हणाले, की शासनाने कायदा करीत असताना त्याची अंमलबजावणी चोखपणे बजावणे आवश्यक आहे. सामाजिक संस्थांनीही प्रबोधनात्मक उपक्रम राबवून जनकजागृती केली आहे.

यासारख्या अनिष्ट व आरोग्याला घातक गोष्टींना मज्जाव होऊ शकतो. शाळा, महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात गुटखा विक्रीवर बंदी आहे. मात्र, गरीब गाई सारखा शिक्षक तक्रार करण्यास धजावत नाही.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

दिसून न दिसल्यासारखी भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे चोरट्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. परिसरातील दुकान आणि पानटपरीमध्ये सर्रास गुटखा मिळत आहे.

त्यामुळे गुटखा विक्री करणार्‍या पानटपरीधारकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

तासगाव : ‘गब्बरसिंग’ लाचलुचपतच्या जाळ्यात, ‘एसीबी’ने पाठलाग करुन पकडले

सुगंधी सुपारी व्यसनाची पहिली पायरी

व्यसनाधीनतेची पहिली पायरी सुगंधी सुपारीपासून होते. शाळेतील दहा वर्षांपासूनचे विद्यार्थी त्याकडे आकर्षिले जातात. तिथूनच व्यसनाची पहिली पायरी चढायला सुरुवात होते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पचनसंस्थेवर झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आरोग्यावर विपरित परिणाम होतो. पालक व शिक्षकांनी मुलांची दप्तरे तपासावित आणि त्यांच्या सोबतच्या मित्रांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

“दापोडी परिसरात जर कोणी पानटपरीधारक चोरून गुटखा विक्री करत असले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. गुटखा विक्री करताना कोणी दुकानदार किंवा पानटपरीधारक आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही. नागरिकांनीही गुटखा विक्रकी करण्याची माहिती पोलिसांना द्यावी.”

– जितेंद्र कदम,
पोलिस निरीक्षक, भोसरी

 

Back to top button