अवकाळीमुळे भाज्यांचे दर कडाडले | पुढारी

अवकाळीमुळे भाज्यांचे दर कडाडले

शिमला, गवार, भेंडी शंभरी पार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. शिमला मिरची, गवार, भेंडी यांचा दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहचला होता, तर शेवगा दोनशेपार गेला होता.

दुसरीकडे पालेभाज्यांच्या दरातही पाच ते सहा रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. दोन दिवसांनंतर सूर्यदर्शन झाल्यानंतर रविवारी
(दि. 5) ग्राहकांनी सकाळपासून भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती.

आज पृथ्वीजवळून जाणार ६ मोठ्या अशनी

या आठवडयात मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारमध्ये रविवारी 2 हजार 600 क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवडयापेक्षा या आठवड्यात आवकमध्ये वाढ झाली आहे.

मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांची आवक घसरल्याचे पाहण्यास मिळाले. गेल्या आठवडयापेक्षा जवळपास दहा टक्क्यांनी कमी म्हणजेच तर 41 हजार 950 गड्डया दाखल झाल्या होत्या. पावसाचा मोठा फटका पालेभाज्यांना बसला आहे.

यशवंत जाधव यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे वित्त मंत्रालयाला सादर; किरीट सोमय्या

एकूणच या वातावरणामुळे तरकारी भाज्यांचे दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.पिंपरीतील येथील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी मटार, गवार याची मोठी आवक झाली.

मटारचा दर 60 रुपये किलो होता. तर, दुसरीकडे भेंडी आणि गवार याचा दर पावशेरला तीस रुपयापर्यंत पोहोचला होता. ऐरवी खरेदी केला जाणारा टोमॅटो, कांदा आणि बटाटा याच्या दरातही किंचिंत वाढ झाली होती.

ही तर माझ्यासाठी तीर्थयात्रा ; रायगड भेटीनंतर राष्ट्रपती आनंदित

फ्लॉवर आणि कोंबीचा दर स्थिर होता. शिमला मिरची, भेंडी, दोडका, श्रावणी घेवडा आणि कारल्याच दर जवळपास सारखाच होता. या सर्व भाज्या 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला होत्या.

उपनगरात भाज्यांचे दर आणखी जास्त असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात मंडईत भाजी खरेदीसाठी आले होते. किरकोळ विक्रेत्यांचे दर शंभर ते दीडशे रुपये किलोपर्यंत होते.

ऐरवी बाजारात असलेला 50 रुपये किलोचा टॉमेटो किरकोळ भावात 30 रुपये पावशेर विकला जात होता. तर, पालेभाज्यांची गड्डी 15 रुपयापर्यंत पोहोचली होती.

Back to top button