बांगलादेशी घुसखोर महिलांना पकडले; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई
पुणे : पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीररीत्या गेल्या बारा वर्षांपासून शहरात राहणार्या 4 बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. बुधवार पेठेत शनिवारी ही कारवाई केली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांत पारपत्र अधिनियम तसेच परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मासुका कलाम फकीर ऊर्फ शेख (वय 25, रा. बुधवार पेठ; मूळ. रा. बांगलादेश), पिया नाझ्मुल सरदार ऊर्फ शेख (वय 27, बुधवार पेठ; मूळ रा. बांगलादेश), रुजी हारूण शेख (वय 38, रा. बांगलादेश), रूपा आकाश मंडोल (वय 40, रा. बुधवार पेठ; मूळ रा. बांगलादेश) अशी कारवाई करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची नावे आहेत.
आरोपी महिला मागील 12 वर्षांपासून बुधवार पेठेतील लिंगप्पा महांकाळे यांचा जुना वाडा येथे शिवा कांबळे यांच्या ताब्यातील तळमजल्यावरील खोलीत राहत होत्या. बुधवार पेठेत बांगलादेशी महिला बेकायदा राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने शनिवारी बुधवार पेठ भागात छापा टाकला. येथून 9 महिलांना ताब्यात घेतले. यात 4 महिला बांगलादेशातील असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशी केली असता त्यांच्याकडे वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले. त्यानुसार त्यांच्यावर फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंदकेला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, अंमलदार तुषार भिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनीषा पुकाळे, रेश्मा कंक यांच्यासह पथकाने केली.
हेही वाचा