पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; नागरिकांना नाहक त्रास | पुढारी

पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; नागरिकांना नाहक त्रास

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न पुन्हा पुढे ढकलले?

शहरातील मोशी, चिखली, आकुर्डी, रावेत व केएसबी चौक परिसरात भटक्या कुत्र्यांचा घोळका असतो. येथून ये-जा करणार्‍या दूचाकी,

चारचाकी वाहनांच्या मागे कुत्र्यांचा घोळका लागल्याने बर्‍याचदा किरकोळ अपघात घडत आहेत.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी होणार भिकारीमुक्त

या घटनांमध्ये अधिक प्रमाणात महिला आणि विद्यार्थी वर्ग घाबरून अधिक वेगाने वाहन चालविल्याने गंभीर अपघाताला सामोर जात आहेत, अशा घटनांमध्ये शहरात वाढ होत आहे.

‘ओमायक्राॅन’मुळे अमेरिकेत १८ वर्षांपुढील सर्वांना बुस्टर डोस देणे आवश्यक’

शहरातील चौका-चौकात आणि गल्लीत-बोळात कुत्र्यांच्या दहशतीचे चित्र दिसून येत आहे.

म्हणून महापालिकेने तत्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

Back to top button