पुणे : काेरेगाव भीमा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू | पुढारी

पुणे : काेरेगाव भीमा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

वढू बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नगर महामार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पादचाऱ्याला उडवले. साेमवारी (दि. २९) दुपारी ही दुर्घटना घडली असून, यात पादचारी रामचंद्र बडमुरगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शामबाबू राधेलाल यादगीर यांनी शिक्रापूर ठाण्यात फिर्याद दिली.

काय भुललासी वरलीया रंगा!

अधिक माहितीनुसार, पादचारी रामचंद्र राचप्पा बडमुरगे (वय ७२, रा. आदर्श चौक, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) साेमवारी दुपारी कोरेगाव भीमा चौकात पुणे-नगर महामार्ग ओलांडत असताना अचानक पुणे बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. या अपघातात त्यांच्या डोक्याला, हातापायाला गंभीर मार लागला हाेता.

राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ ; रजनी पाटील यांनी घेतली मराठीत शपथ

स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाला हाेता. अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे व पोलिस नाईक अमोल नलगे करीत आहेत.

हेही वाचा

IND vs NZ Test : भारताविरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना अनिर्णीत

R. Ashwin : अश्विनचा विक्रम!, कसोटी विकेट्सच्या यादीत हरभजनला टाकले मागे

भारत-पाकिस्तान युद्ध : विजयाच्या ५० वर्षानिमित्त ‘सुवर्ण विजय’ व्दिसप्ताह

आता होणार दुप्पट दंड; सिग्नल तोडल्यास, लायन्स नसल्यास भरावे लागणार एवढे रुपये …

बारामती : टॅटूवरून पोलिसांनी लावला बलात्काऱ्याचा शोध

 

Back to top button