पुणे : वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे इच्छुक असून ते आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. याबाबत वसंत मोरे यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोन वरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी मिळाल्यावर याचा तोटा नेमका महाविकास आघाडीला होतो कि महायुतीला? हे पहावं लागेल. आज प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची मुंबईत भेट होणार असून निवडक कार्यकर्त्यांसह वसंत मोरे मुंबईकडे रवाना झाले आहे.
हेही वाचा