त्यावर संबंधित अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात बुधवारी मात्र या प्रकारावर पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली गेली नसल्याचे समोर आले. आयुक्तांनीही चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. एवढी मोठी घटना होऊन वरिष्ठ अधिकार्यांनी त्याबाबत साधी दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडूनच या प्रकरणावर पडदा तर टाकला जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, ही रक्कम एका माजी आमदाराशीसंबंधित ठेकेदार कंपनीकडून आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रकारानंतर ती रक्कम नक्की कोणी गायब केली, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.