गुरुवर्य हैबतबाबांच्या पायरी पूजनाने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ | पुढारी

गुरुवर्य हैबतबाबांच्या पायरी पूजनाने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : अवघे आयुष्य माऊलींच्या सेवेत अर्पण करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबतबाबांच्या पायरी पूजनाने ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यास शनिवार (दि.२७) पासून प्रारंभ झाला.

पंढरपूरमधील संत नामदेव महाराज पायरीप्रमाणेच आळंदीत माऊली चरणी हैबतबाबा यांची पायरी असून त्यांच्या परंपरागत पायरी पूजनाने सोहळ्याला प्रारंभ होत असतो.

अभिषेक व दुधआरती पूजा कार्यक्रम

पहाटे पवमान  अभिषेक व दुधआरती पूजा कार्यक्रम  उरकल्यानंतर सकाळी नऊ वाजता मुख्य महाद्वारासमोर असलेल्या हैबतबाबांच्या पायरीचे पूजन विधीवत मंत्रोपचार करत हैबतबाबांचे वंशज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर -पवार, राजेंद्र आरपळकर, संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, ऍड. विकास ढगे पाटील यांचे हस्ते पायरीचे पूजन करण्यात आले. मंत्रोपचार व धार्मिक विधी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल गांधी, श्रीरंग तुर्की या ब्रम्हवृंदानी केले

हुपरी चाेरी : चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिस ठाण्यासमोरीलचं मोबाईल शॉपी फोडली

यावेळी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, मुख्याधिकारी अंकुश जाधव, मंडलाधिकारी स्मिता जोशी, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर, संस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, माजी नगरसेवक संतोष गावडे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, मानकरी माऊली गुळुंजकर, माऊलीं दिघे व आळंदीकर ग्रामस्थ, भाविक वारकरी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button