पुणे : कुरकुंभ येथील अपघातात तीन ठार | पुढारी

पुणे : कुरकुंभ येथील अपघातात तीन ठार

कुरकुंभ (पुणे) : पुढारी वृत्तसेवा

कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीतील एमआयडीसी चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत तीनजण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरील कुटुंबीय परप्रांतीय असून ते मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी मजुरीचे काम उरकून ते कुरकुंभला येत होते. यादरम्यान पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी चौकात ते आले असता त्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.

या अपघात मध्ये एक महिला, एक अल्पवयीन मुलगा व मुलगी जागीच ठार झाले, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना दौंड येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये एक पुरूष, एक अल्पवयीन मुलगा व मुलगी यांचा समावेश आहे. यातील दोघांना हाताला-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे.

Back to top button