पुण्यातील भन्नाट नावे असलेल्या मंदिरांनी जपला आपलेपणा : गाडगीळ | पुढारी

पुण्यातील भन्नाट नावे असलेल्या मंदिरांनी जपला आपलेपणा : गाडगीळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आजूबाजूला सोन्याची अनेक दुकाने असलेला सोन्या मारुती, शाळेत जाताना आजी सांगायची आणि नंतर सवयीचा भाग झालेला दाढीवाला दत्त, चिमण्या गणपती आणि खुन्या मुरलीधर, या पुणे शहरातील भन्नाट नावांच्या मंदिरांनी उत्सुकता चाळवीत आपलेपणा जपला, अशा शब्दांत ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. 

पुणे : पोटच्या मुलाने केले बेदखल; पण पोलिसी खाक्याने वृद्धाला मिळवून दिले छत्र

पुण्यातील तेजस गोखले या तरुणाने आपल्या ‘खलबत्ता’ या उपक्रमांतर्गत पुण्यातील विविध मंदिरांची चित्रे व त्यामागील रंजककथा सांगणाऱ्या ‘देव बिव’ या प्रदर्शनाचे आयोजन भांडारकर रस्त्यावरील ‘आर्ट टू डे गॅलरी’त केले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटना वेळी गाडगीळ बोलत होते. या वेळी ‘देव बिव’ या पुस्तकाचे व दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

समाजकल्याण अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस

गाडगीळ म्हणाले की, जुन्या मंदिरांमध्ये सुरुवातीच्या काळात अनेक कीर्तनकारांची प्रवचने व्हायची. एरवी पाठ न होणारी स्तोत्रे याच कार्यक्रमांमध्ये कानावर पडायची. याच ठिकाणी शब्दोच्चार, आवाजाची पट्टी यांची आवड निर्माण झाली, चालू घडामोडीचे शिक्षण, याच कार्यक्रमांमधून मिळाले. याचा उपयोग मुलाखतकार म्हणून काम करताना झाला. इतरांना नावे ठेवणार्‍या पुणेकरांना पत्ता सांगायची हमखास खूण असलेली शहरातील ही मंदिरे आणि देवांना भन्नाट नावे देत आपलेसे केले. 28 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे गॅलरी येथे सकाळी 10.30 ते रात्री 8.30 या वेळेत रसिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

हेही वाचा

नायजेरीयन ठग वापरताहेत भारतीय खाती

राज्यात 2८ ते ३० तारखेपर्यंत ११ जिल्ह्यांना येलो ॲलर्ट; अनेक भागात मुसळधार पावसाचे संकेत

बारामती : पोलिसांच्या भीतीने नदीत उडी टाकल्याने बुडून एकाचा मृत्यू

राज्यात यंदा ठराविक व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच पसंती

कमी प्रवेश असलेले अभ्यासक्रम बंद

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम वेगात सुरू

 

Back to top button