पुणे महापालिकेची प्रभागरचना लांबणीवर पडणार! | पुढारी

पुणे महापालिकेची प्रभागरचना लांबणीवर पडणार!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची प्रभागरचना करण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे प्रभागरचना जाहीर होण्याचा कार्यक्रमही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Shreyas Iyer : कसोटी पदार्पणातच शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू

पुणे, पिपरी-चिंचवडसह महापालिकांना तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत हा कच्चा आराखडा गोपनीयरित्या निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. त्यानुसार आता पुणे महापालिकेला हा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी अवघा 5 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, महापालिकेचे प्रभाग रचनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

पुणे : पोटच्या मुलाने केले बेदखल; पण पोलिसी खाक्याने वृद्धाला मिळवून दिले छत्र

पुढील पाच दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे, ही बाब लक्षात घेऊन आयुक्त विक्रम कुमार यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. त्यात प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी 15 दिवसांची म्हणजेच 15 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ मागितली आहे. आता निवडणूक आयोग त्यावर काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे.

पुणे : खराडेवाडी येथे दोन ठिकाणी घरफोडी

निवडणुकाही लांबणीवर?

राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेला मुदतवाढ दिल्यास त्याचा परिणाम प्रभागरचनेच्या कार्यक्रमावर होणार आहे. त्यात प्रभागरचना जाहीर होण्यापासून त्यावरील हरकती-सूचना, त्यानंतर आरक्षण सोडत आदींच्या सर्व प्रक्रियेला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी निवडणुकाही काही कालावधीसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बारामती शहर पोलिसांकडून वेश्या व्यवसायाचा बिमोड; दलाल महिलेवर कारवाई

  •  शहराची लोकसंख्या : ३५ लाख ५६ हजार ८२४
  • अनुसूचित जाती : ४ लाख ८० हजार १७
  • अनुसूचित जमाती : ४१ हजार ५६१
  • नगरसेवकांची संख्या : १७३
  • प्रभागांचीएकूण संख्या : ५८
  • तीन सदस्यीय प्रभाग : ५७
  • दोन सदस्यीय प्रभाग : १

Back to top button