पुणे : खराडेवाडी येथे दोन ठिकाणी घरफोडी | पुढारी

पुणे : खराडेवाडी येथे दोन ठिकाणी घरफोडी

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा : कारखेल येथील अखंड हरिनाम सप्ताह निमित घरातील लोक किर्तनाला गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी खराडेवाडी ( ता. बारामती) येथील भोसलेवस्तीवरील तीन घरे फोडून दोन घरातून तब्बल दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना (दि. २५) गुरुवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर भयभीत झालेल्या गावक-यांनी रात्र जागून काढली.

Shreyas Iyer : कसोटी पदार्पणातच शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू

येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मधुकर एकनाथ भोसले हे आपल्या कुटूंबासह कारखेल येथे ह.भ.प निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाला गेले होते. घरी कोणी नाही, याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी भोसले यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यानी घरातील दोन पेट्या आणि एक बॅगमधून रोख रक्कम सहा हजार रुपये काढून घेतले व दोन पेट्या व एक बॅग जवळच्या शेतात फेकून दिल्या. या पेटीत कागदपत्रे होती. ती तिथेच फेकून देवून चोरट्यानी पोबारा केला.

ST Workers strike : राज्यात एसटीच्या चाकांनी घेतला वेग

उत्तम एकनाथ भोसले यांच्या घरातही चोरट्यानी प्रवेश करुन कपाटातील दागिने चोरुन नेले. यामध्ये दोन तोळ्याचा सोन्याचा गंठन, चांदीचे पैंजण (दोन जोडी), चांदीच्या बांगड्या (दोन जोडी), लहान मुलांचे कमरेचे चांदीचे पैंजण, सोन्याच्या दोन ग्रॅमच्या अंगठ्या, कर्णफुले, १ ग्रॅमच्या सोन्याच्या मनगटी असा मिळवून सध्याच्या बाजारभावानुसार तब्बल दीड लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. येथील सत्यवान धोंडिबा भोसले यांच्या घरातील कपाटे चोरट्यानी खोलून ठेवली. मात्र चोरट्यांच्या हाताला काहीही लागले नाही. त्यामुळे तेथून चोरट्यानी पळ काढला.

Constitution Day 2021 : आपल्या संविधानाचे हस्तलेखन कोणी केले माहित आहे का? 

या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून घटनेची माहिती घेतली. या घटनेची बातमी परिसरात सोशल मिडियावरुन वा-यासारखी पसरल्यानंतर वाड्यावस्त्यावरील लोकांनी रात्र जागून काढली.

26/11 Mumbai Attack : १३ वर्षे पूर्ण; दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम

Back to top button