पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या अनंत पतसंस्थेवरील दरोडा सराईंताकडूनच | पुढारी

पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या अनंत पतसंस्थेवरील दरोडा सराईंताकडूनच

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे- नाशिक महामार्गावरील १४ नंबर येथे अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर पडलेला दरोडा सराईत गुन्हेगारांनी घातला असून, लवकर पोलीस त्यांना पकडतील असे कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

हवाई मालवाहतुक होणार सुसाट

बुधवारी (दि. २४) दुपारी दीडच्या सुमारास मोटरसायकलवर आलेल्या दोन दरोडेखोरांनी अनंत ग्रामीण पतसंस्थेत घुसून व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांनी विरोध करताच एका दरोडेखोराने भोर यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत भोर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी हे मोटरसायकलवरून फरार झाले. प्राथमिक तपासात आरोपी हे बोरीच्या दिशेला गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण या मार्गावरील कालव्या जवळ आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हेल्मेट व कपडे पोलिसांना मिळून आले आहेत.

विमानतळाची सुरक्षा वाढवणार

विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस पथके तपास कामी पाठवली आहेत. या घटनेचा तपास त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्याकडे सोपवला आहे.

एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या नेतृत्त्वात उभी फूट ; सदाभाऊ खोत आणि पडळकरांची एक्झिट

भोर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

दरम्यान, या दरोड्यात गोळी लागून मृत्युमुखी पडलेल्या राजेंद्र भोर यांच्या पार्थिवावर १४ नंबर या ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. भोर हे संस्थेत मागील तीस वर्षांपासून कार्यरत होते, ते अत्यंत हुशार व संयमी होते त्यांना सहकार क्षेत्राचा चांगला अभ्यास होता त्यांच्याबद्दल घडलेल्या या घटनेने तालुक्यातील सर्व पतसंस्थांमधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मधून हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील पतसंस्थेच्या माध्यमातून निधी संकलित करून भोर यांच्या कुटुंबाला मदत देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विक्रम भोर यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यातील बॅंकिंग क्षेत्रात तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत अन‌् साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत!

पिंपरखेड दरोड्यानंतरचा दुसरा प्रकार

नुकतीच जुन्नर तालुक्याच्या सीमेलगत असणाऱ्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड ह्या ठिकाणी दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा टाकून करोडो रुपयांची लूट केली गेली होती, त्यानंतर लगेच दुसरी घटना जुन्नर तालुक्यात घडल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आजपासूनच लागा तयारीला ! एक डिसेंबरपासून शाळेची घंटा वाजणार

सुरक्षरक्षकच नाहीत

आजही तालुक्यातील अनेक बँकांमध्ये सुरक्षारक्षक नाहीत, यापूर्वी बँकेमध्ये सशस्त्र सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते, मात्र त्यांना काढून टाकण्यात आले आहे. अद्याप बँकेमध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे बँकेची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहावयास मिळत आहे. यावर विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना विचारणा केली असता, त्यांनी लवकरच याबाबत बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी बरोबर बोलून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.

Back to top button