सराईत सोनसाखळी चोरट्यासह चोरीचा माल घेणारा सराफ जेरबंद | पुढारी

सराईत सोनसाखळी चोरट्यासह चोरीचा माल घेणारा सराफ जेरबंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दोघा सराईत सोनसाखळी चोरट्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी बारामती येथून बेड्या ठोकल्या. यावेळी चोरीचे सोने घेणार्‍या सराफाला देखील अटक करण्यात आली आहे. अशोक नामदेव गंगावणे (वय.31), अनिल रघुनाथ बिरदवडे (वय.32,रा. बांदलवाडी,ता.बारामती) व सराफ अकाश महादेव सोनार (रा. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे.

परमबीर सिंग २३४ दिवसांनी मुंबई पोलिसांसमोर हजर; चौकशी सुरू

विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात हबीबा अब्दुल शेख (वय.51,रा. कळस विश्रांतवाडी) यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी हिसकावल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. हा प्रकार 2 नोव्हेंबर रोजी घडला होता. फिर्यादी हे त्यांच्या पान टपरी समोर बसले असताना दोघांनी सोनसाखळी हिसकावली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

आजपासूनच लागा तयारीला ! एक डिसेंबरपासून शाळेची घंटा वाजणार

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी तपास केला असता, आरोपी बारामतीच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यावेळी पोलिस हवालदार दिपक चव्हाण यांना सोनसाखळी चोरी करणारे दोघे सराईत शहरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गंगावणे व बिरदवडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची कबुली देत ऐवज अकाश सोनार या सराफाला विक्री केल्याचे सांंगितले. त्यानंतर पोलिसांनी सराफाला अटक करून तो ऐवज जप्त केला. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस अजय चांदेखेडे गुन्हे निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लहु सातपुते, कर्मचारी दिपक चव्हाण, संजय किर्वे, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, शिवाजी गोपनर यांच्या पथकाने केली. यावेळी पी फोर चे विशेष पोलिस अधिकारी राज राठोड यांनी तपासात मदत केली.

एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या नेतृत्त्वात उभी फूट ; सदाभाऊ खोत आणि पडळकरांची एक्झिट

पोलिसांनी खंगाळले 200 सीसीटीव्ही कॅमेरे

दोन्ही चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणापासून ते बारामती पर्यंत तब्बल दोनशे पेक्षा अधिक कॅमेर्‍यांची तपासणी केली. सोनसाखळी हिसकावताना चोरटे परिसरातील कॅमेर्‍यात कैद झाले होते. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक ठिकाणचे कॅमेरे खंगाळले. चोरीसह इतर गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. सी वॉचच्या माध्यमातून पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणचे कॅमेरे एकत्रीत जोडले आहेत.

हेही वाचा

Shakti Mills Gang Rape Case: शक्‍ती मिल सामूहिक बलात्‍कार प्रकरणातील तिघा दोषींना जन्‍मठेप

विमानतळाची सुरक्षा वाढवणार

हवाई मालवाहतुक होणार सुसाट

Apurva Nemlekar : चाहते म्हणताहेत, ‘शेवंता, आता मालिका पाहणं बंद’

Back to top button