ढोल बजने लगा!... महापालिका निवडणुकीची चाहूल | पुढारी

ढोल बजने लगा!... महापालिका निवडणुकीची चाहूल

पुणे : पांडुरंग सांडभोर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी तब्बल
30 हजार कर्मचारी वर्ग लागणार असून, त्यासाठी महापालिकेने शहरातील नऊशे शैक्षणिक संस्था आणि साडेचारशे शासकीय कार्यालयांना पत्र पाठवून त्यांच्याकडील कर्मचार्‍यांची माहिती मागविली आहे.

ST Workers Strike : ‘एसटी संप सुरुच, शरद पवार, अनिल परब यांच्याकडून आंदोलन तोडण्याचा प्रयत्न’

महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे. त्यासाठीच्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने प्रभाग रचनेच्या कामाबरोबरच निवडणुकीसाठी अन्य तयारींच्या कामाला सुरुवात केली आहे.

Shakti Mills Gang Rape Case: शक्‍ती मिल सामूहिक बलात्‍कार प्रकरणातील तिघा दोषींना जन्‍मठेप

या निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीसाठी तब्बल 30 हजार कर्मचार्‍यांची आवश्यकता भासणार आहे. पालिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाने साडेनऊशे शैक्षणिक संस्था आणि साडेचारशे शासकीय कार्यालय यांच्याकडील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती मागविली आहे. यासंबंधीचे पत्र अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सर्व कार्यालये व संस्थांना पाठविले आहे.

विमानतळाची सुरक्षा वाढवणार

पाच दिवसांत माहिती बंधनकारक

महापालिकेने कर्मचार्‍यांची जी माहिती मागविली आहे, त्यासंबंधीची पत्रे शासकीय कार्यालयाला मिळाल्यानंतर पाच दिवसांत कर्मचार्‍यांची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यात 31 डिसेंबरपर्यंत सेवा निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांची माहिती देण्यात येऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

  • 30 हजार कर्मचार्‍यांची माहिती मागविली
  • 450 शासकीय कार्यालये व 900 शैक्षणिक संस्थांना पत्र

Karnataka ACB : चक्क ड्रेनेज पाइपमधून पडू लागल्या नोटा अन् पाण्यासारखा पैसा…

Back to top button