हवाई मालवाहतुक होणार सुसाट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विमानतळ प्रशासन फक्त मालवाहतुकीसाठीच भारतीय वायुदलाच्या ताब्यात असलेली 2.5 एकर जागा भाड्याने घेणार आहे. या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यामुळे आता पुण्यातून इतर राज्यांत विमानाने होणारी मालवाहतुकीची सेवा पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने आणि वेगवान होणार आहे.

Shakti Mills Gang Rape : शक्ती मिल सामूहिक बलत्कार प्रकरण : सात वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

विमानतळ सल्लागार समितीची बैठक बुधवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात पार पडली. या वेळी विमानतळ प्रशासनाने ही माहिती दिली. विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष व खासदार गिरीश बापट, आमदार सुनील टिंगरे, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके व अन्य उपस्थित होते.

ParamBir Singh : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल

पुणे आणि परिसरात आता इंडस्ट्रिअल कंपन्या वाढत आहेत. त्यांना त्यांच्याकडील काही पार्सल तातडीने परराज्यात पाठवावे लागतात. या वेळी अनेक कंपन्या विमानवाहतुकीला पसंती देतात. मात्र, सध्या विमानतळ प्रशासनाकडे असलेली मालवाहतुकीसाठीची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने भारतीय वायुदलाच्या ताब्यात असलेली ही अडीच एकरची जागा भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही जागा भाड्याने घेण्यासंदर्भातील प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

सीएसकेची रिटेन पॉलिसी आली समोर; तीन भारतीय खेळाडू रिटेन करण्याची शक्यता

विमानतळाचे नवे टर्मिनल पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये खुले

विमानतळ प्रशासनाकडून पुणे विमानतळाशेजारीच नव्या टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे. ते काम 65 टक्के पूर्ण झाले असून, पुढच्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत प्रवाशांसाठी खुले होणार आहे, तर येत्या दोन-तीन महिन्यांत कार पार्किंग वाहनांसाठी खुले करण्यात येईल. त्यामुळे येथील पार्किंगची समस्या सुटणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

TMC : मेघालयमध्‍ये काॅंग्रेसला भगदाड ! १२ आमदारांनी केला तृणमूलमध्ये प्रवेश

यामुळे मालवाहतूक होणार सुसाट

‘‘आगामी काळात पुण्यातून परराज्यासह दुसर्‍या जिल्ह्यांमध्ये विमानाने मालवाहतुकीचे प्रमाण वाढणार आहे. त्यासंदर्भात आम्ही विमानतळ प्रशासनाला सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासन भारतीय वायुदलाची ही 2.5 एकर जागा भाड्याने घेणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे आता पुणे विमानतळावरून मालवाहतूक पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या क्षमतेने होणार आहे.’’
                                                                                        – गिरीश बापट, खासदार, अध्यक्ष, विमानतळ सल्लागार समिती

Exit mobile version