‘ती’ आरोग्य केंद्रे होणार स्थलांतरित | पुढारी

‘ती’ आरोग्य केंद्रे होणार स्थलांतरित

पुणे : पुढारी वृत्तसेवा हवेली आणि मुळशी तालुक्यांतील पुणे महापालिकेच्या हद्दीलगत असलेली 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येत असलेली प्राथमिक आणि उप आरोग्य केंद्रे स्थलांतरित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

जुन्नर : अनंत नागरी सहकारी पतसंस्थेवर दरोडा, व्यवस्थापकाला घातल्या गोळ्या

प्रस्तावाला राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर ती स्थलांतरित केली जाणार असल्याची माहिती आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी दिली. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी खडकवासला, फुरसुंगी, वाघोली आणि देहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा यात समावेश आहे. खडकवासला केंद्र अष्टापूर येथे फुरसुंगी केंद्र फेवर येथे वाघोली केंद्र केसनंद येथे, तर देहू केंद्र कदमवाक वस्ती (तालुका हवेली) येथे स्थलांतरित केले जाणार आहे.

‘पाहुणे’ आले; पण उशीरा

चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सोळा उपकेंद्रांचा समावेश आहे. त्यांचे स्थलांतरण असे- फुरसुंगी-भावडी, उरुळी देवाची- कोरेगाव मूळ, खानभाग-आभाळवाडी, वाघोली- निरगुडी, लोहगाव -वढू बुद्रुक, साडेसतरानळी-कवडी माळवाडी, केशवनगर-वाकवस्ती, मांजरी बुद्रुक-कोळपे वस्ती, महादेवनगर-लोणी स्टेशन, खडकवासला-श्रीरामनगर, धायरी-घेरा सिंहगड, नरे-सोरतापवाडी, नांदेड-वाळीत, नांदोशी-पेठ, शिवणे -बकोरी, उत्तमनगर-कुडजे, आंबेगाव बुद्रुक- बुर्केगाव, सुस-नांदे, बावधन- भुगाव.

हेही वाचा

मुंबईत भाजप- मनसे येणार एकत्र ? ; राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट

एसटी कर्मचार्‍यांचा संप चर्चेतूनच सुटू शकतो : शरद पवार

Rajesh Tope : पहिली ते चौथी वर्ग सुरू होण्याचे राज्य आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Back to top button