‘पाहुणे’ आले; पण उशीरा | पुढारी

‘पाहुणे’ आले; पण उशीरा

सुनील जगताप
पुणे : जगण्यासाठी आवश्यक असलेले चांगले पर्यावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिलांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधण्याकरिता दूर अंतरावरून स्थलांतर करीत पक्षी येतात. पक्ष्यांचे स्थलांतर ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरीही निसर्गातील बदलाचा त्यांच्या स्थलांतरावर परिणाम होतो. शिक्षणाच्या माहेरघरात ऑक्टोबरमध्ये येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन यावर्षी तब्बल महिनाभर उशिरा झाले आहे.

ब्राह्मिनी बदक

जुन्नर : अनंत नागरी सहकारी पतसंस्थेवर दरोडा, व्यवस्थापकाला घातल्या गोळ्या

वर्षाच्या एका विशिष्ट कालावधीत त्यांचे स्थलांतर होते. काही पक्षी अन्न आणि प्रजननासाठी वर्षाच्या वेगवेगळ्या हंगामात स्थलांतर करतात. पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा, अशा तीनही ऋतुंत स्थलांतरित पक्षी येत असतात. मात्र, हिवाळ्यामध्ये येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण अधिक असले, तरी अलीकडच्या काळात हे प्रमाण घटत चालले आहे. वाढत्या प्रदूषणाबरोबरच प्रदूषित पाण्यामुळे पाणथळी येणार्‍या पक्ष्यांचे प्रमाण निम्म्याने कमी झाले असून, ही पुणे शहरासाठी धोक्याची घंटा असल्याचे मत पक्षीतज्ज्ञांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.

मानमोड्या ( Eurasian Wryneck)

मुंबईत भाजप- मनसे येणार एकत्र ? ; राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट

का येतात पक्षी?

बर्फाच्छादित प्रदेशात थंडीने जलाशये गोठतात. पक्ष्यांना अन्नाची कमतरता भासते. त्यामुळे त्यांचा शोध संतुलित सुरक्षित वातावरणातील घरट्यांसाठी सुरू होतो. प्रत्येक पक्ष्याला सुरक्षित जागा हवी असते. त्यामुळे हिवाळ्यात पक्षी आपल्याकडील वातावरणात निवारा शोधण्यासाठी येतात. देशात मध्य, पूर्व आणि उत्तर-दक्षिण युरोप, रशिया, सैबेरिया, मंगोलिया, तिबेट येथून पाहुणे पक्षी येतात. मंगोलियातून येणारे पक्षी चार हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून आपल्या भागात येतात. काही पक्षी 20 हजार ते 54 हजार किलोमीटरचा प्रवास करीत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

मोन्टागुचा भोवत्या (Montagu’s Harrier)

खासदार गौतम गंभीर यांना ‘इसिस काश्‍मीर’कडून ठार मारण्याची धमकी

‘‘जगभरातील हवामानामुळे या पक्ष्यांचे जीवनचक्र बदलते आहे. अभ्यासकांसाठी हा चिंतेचा विषय झाला आहे. वातावरणातील बदलांमुळे विशेषतः शिकारी पक्ष्यांचे स्थलांतर लांबले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभ्यासकांनी या बदलाची नोंद घेतली आहे. रशिया, उत्तर युरोप, मंगोलिया, कॅनडा, चीन आणि जपानच्या काही भागांतील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. पक्ष्यांचे स्थलांतर लांबल्याने नोव्हेंबरमध्ये पक्षी पाहायला मिळत आहेत. पाणथळावर ब्राह्मणी बदक (Brahminy Duck), पट्टा कदंब बदक, तलवार बदक, चक्रांद बदक, चंडोल, हॅरिहर, चंडोल, वटवट्या, फ्लायकॅच, गुलाबी मैना आदी स्थलांतरित पक्षी आढळून येत आहेत.’’
डॉ. सतीश पांडे, पक्षीतज्ज्ञ

Rajesh Tope : पहिली ते चौथी वर्ग सुरू होण्याचे राज्य आरोग्यमंत्र्यांचे संकेत

‘‘शहरात पाणवठ्यावर आणि झुडपी किंवा माळरानावर येणार्‍या पक्ष्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. पाणवठ्यावर विविध प्रकारचे बदक येतात, तर मानमोड्या (Eurasian Wryneck), मॉन्टागुचा भोवत्या (Montagu’s Harrier), लाल डोक्याचा भारीट (Red-headed Bunting), नेपाळी गरुड (Steppe Eagle), युरोपियन नीलपंख (European Roller), छोटा कोकीळ (Lesser Cuck) आदी पक्षी आढळून येतात. पाणवठ्यावर कृष्ण बलाक (Black Stork), भिवई बदक (Garganey) आणि बदकांचे विविध प्रकार जास्त प्रमाणात आढळतात. इतर ऋतुंपेक्षा हिवाळ्यात येणार्‍या पक्ष्यांचे प्रमाण नक्कीच अधिक असते.’’

स्वप्निल थत्ते, पक्षीतज्ज्ञ

Back to top button