हिंद केसरी बैलगाडा घाटाची उभारणी; फुलगावच्या यात्रा उत्सवासाठी तयारी

हिंद केसरी बैलगाडा घाटाची उभारणी; फुलगावच्या यात्रा उत्सवासाठी तयारी
Published on
Updated on

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मोठा यात्रा उत्सव म्हणून प्रचलित असलेल्या फुलगाव (ता. हवेली) गावच्या श्रीभैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव येत्या 18, 19, 20 जानेवारी असा तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या यात्रा उत्सवानिमित्त फुलगाव व वढू खुर्द येथील ग्रामस्थांनी गावातील ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून तब्बल 1 लाख बैलगाडा शौकिन बसतील, अशा दिमाखादार भव्य दिव्य हिंद केसरी बैलगाडा घाटाचे उभारणी केली आहे.

या घाटाच्या कामासाठी एकूण 26 लाख रुपये खर्च आला असून यासाठी फुलगाव व वढू खुर्द येथील दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ यांची मदत व लोकवर्गणी करण्यात आली. हा घाट आता दिमाखादारपणे फुलगाव येथील भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवासाठी सज्ज झाला असल्याची माहिती युवा नेते तथा नॅशनल चॅम्पियन पै. किरण साकोरे यांनी दिली. या बैलगाडा घाटाची पूजा फुलगावच्या सरपंच मंदाकिनी संपत साकोरे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या घाटाचे काम पूर्ण झाले असून घाटाच्या सर्व कामाची पाहणी युवा नेते तथा नॅशनल चॅम्पियन पै. किरण साकोरे, माजी उपसरपंच राहुल वागस्कर, पोलिस पाटील बाळासाहेब साकोरे, माजी चेअरमन राजाराम साकोरे, माजी उपसरपंच राजेंद्र खुळे, शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष शिवले, युवा नेते संभाजी वागस्कर, माजी उपसरपंच पोपट खुळे, हवेली तालुका बैलगाडा संघटना अध्यक्ष आप्पासाहेब साकोरे, पुढारी ग्रुपचे संस्थापक भानुदास वागस्कर, विजय वागस्कर, माजी सरपंच कांताराम वागस्कर, माजी सरपंच कांतीलाल साकोरे, मच्छिंद्र वागस्कर, काळुराम वागस्कर, संदेश खुळे, स्वप्नील साकोरे, सुदाम खुळे, ओमकर साकोरे, सोमनाथ खुळे, अशोक सकोरे, सोमनाथ गवारे तसेच सर्व गावातील बैलगाडा मालक, ग्रामस्थ आदींनी केली.

16 जानेवारीला टोकणवाटप

ज्यांनी घाटाच्या कामासाठी आर्थिक देणगी, वस्तुरूपी मदत केलेल्या फुलगावतील दानशूर दात्यांचे, ग्रामस्थांचे आभार गावच्या वतीने नॅशनल चॅम्पियन पै. किरण साकोरे यांनी मानले असल्याचे राजेंद्र खुळे यांनी सांगितले. या यात्रेनिमित्त बैलगाडा घाटाचे टोकण 16 जानेवारीला फुलगावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वाटप करण्यात येणार आहे. याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घेण्याचे आवाहन फुलगाव यात्रा उत्सव कमिटीकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news