दैनिक पुढारी वर्धापन दिनानिमित्त आज रंगणार स्नेहमेळावा

दैनिक पुढारी वर्धापन दिनानिमित्त आज रंगणार स्नेहमेळावा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: दैनिक पुढारीचा स्नेहमेळावा म्हणजे आपुलकीचा गोड झरा.. जुन्या आठवणींना मिळेल उजाळा.. नव्या मैत्रीचा गुंफूया नवा धागा.. जुळवू नवे स्नेहबंध, जोडू नवा जिव्हाळा.. दैनिक पुढारी पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 12) मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. दैनिक पुढारी 85 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 86 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त हा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन 'पुढारी' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. 'पुढारी'च्या वर्धापन दिनानिमित्त काळेवाडी-विजयनगर येथील मदर तेरेसा फ्लायओव्हर शेजारी 'रागा पॅलेस' येथे हा मेळावा होणार आहे.

शुक्रवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या वेळी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री
डॉ. प्रतापसिंह जाधव, दैनिक पुढारीचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दैनिक पुढारीचे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी दैनिक पुढारीचे इवलेसे रोपटे लावले. त्याचा आता वटवृक्ष बनला आहे. दैनिक पुढारीने आपल्या साडेआठ दशकांच्या प्रदीर्घ कालखंडातील अनेक संघर्षात समाजाचे नेतृत्व केले. निर्भीड, सडेतोड पत्रकारितेने 'पुढारी'ने आपला वेगळा ठसा उमटविला. त्याचबरोबर अनेक सामाजिक कामे करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले.

काळानुसार बदलत दैनिक पुढारीने आधी डिजिटल माध्यमात पाऊल टाकून लक्षणीय कामगिरी केली. त्यानंतर गेल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रवेश करून 'पुढारी' समूहाने 'पुढारी' न्यूज ही वृत्तवाहिनी सुरू केली. ती अल्पावधीतच अवघ्या महाराष्ट्रवासीयांच्या प्रेमाला, कौतुकाला पात्र ठरली आहे.दैनिक पुढारीच्या वर्धापन दिनानिमित्त मस्त थंडीची मजा घेत, चहापान आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत समाजातील विविध क्षेत्रांतील लहानथोरांशी गप्पा मारण्याची मैफल रंगणार आहे. तसेच, दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूज या चॅनेलशी आपले ऋणानुबंध अधिक वृद्धींगत करण्याची ही एक अनोखी संधीच आहे. त्यामुळे अधिकाधिक पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनी या मेळाव्यास यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news