पुणे : मर्जीतील ठेकेदारासाठी पात्र ठेकेदाराला केले अपात्र

भवानी पेठ

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मर्जीतील ठेकेदारांना काम मिळवून देण्यासाठी पात्र ठेकेदारांना कशा पध्दतीने अपात्र करण्याचे उद्योग महापालिकेचे अधिकारी करतात यासंबधीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने पात्र ठरविलेल्या ठेकेदाराला भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने अपात्र ठरविले आहे.

महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आणि त्यात प्रामुख्याने नगरसेवकांच्या ‘सी’ यादीच्या निधीतून होणारी कामे नगरसेवक आणि अधिकारी यांच्या संगनमताने मर्जीतील ठेकेदारांना दिली जातात. त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता केली जाते. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातही असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे.

या क्षेत्रीय कार्यालयाकडून गत महिन्यात प्रभाग क्र. 19 ब मधील 10 लाख रुपये रक्कमेच्या दोन स्वतंत्र कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात विविध ठिकाणी फरशी बसविणे आणि मटण मार्केट व परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे या कामांचा समावेश आहे. या दोन्ही कामांसाठी एकूण पाच निविदा आल्या होत्या. त्यात दोन्ही ठिकाणी दोन ठेकेदार अपात्र झाले तर तीन पात्र ठरले.

धक्कादायक म्हणजे, यामधील जगदीश राजेंद्र दुधे हा ठेकेदार पात्र ठरत असतानाही त्यांना काही कागदपत्राच्या आधारे अपात्र ठरविण्यात आले आहेत. याचे उदाहरण म्हणजे पेठ क्षेत्रीय कार्यालयाने अपात्र ठरविल्यानंतर दुसर्‍या दिवशी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडील प्रभाग क्र. 33 क मधील विविध विकासकामे करण्याच्या निविदांमध्ये हा ठेकेदार पात्र झाला आहे.

दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांचे स्वरुप आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे एकच असतानाही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने मात्र मर्जीतील ठेकेदाराला पात्र करण्यासाठी पात्र ठेकेदाराला अपात्र करण्याचा उद्योग केला आहे. याबाबत संबधित क्षेत्रीय अधिकार्‍याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

नगरसेवकाच्या नातेवाईकालाच काम!

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ज्या कामांमध्ये पात्र ठेकेदाराला अपात्र केले. ते काम एका नगरसेवकाच्या कुंटुंबातील व्यक्तीलाच देण्याचा घाट घातला असल्याची चर्चा आहे.

हे वाचलंत का? 

Exit mobile version