महाराष्ट् मराठी पत्रकार संघ आणि भगवती समुहाच्या वतीने माध्यमकर्मीयांसाठी पुण्यात उभारण्यात येणार्या गृहप्रकल्पाचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. या प्रसंगी ते बोलत होेते. यावेळी दै.पुढारीचे चेअरमन, समूह संपादक डॉ.योगेश जाधव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, दै.लोकमतचे संपादक संजय आवटे, दै.सकाळचे संपादक सम्राट फडणीस, भगवती ग्रुपचे बाबासाहेब औटी, पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते. यावेळी देशातील अकरा नद्यांचे पाणी जलकुंडात अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.