Pune News : डायस प्लॉट झोपडपट्टीतील घरांत सांडपाण्याचा शिरकाव

Pune News : डायस प्लॉट झोपडपट्टीतील घरांत सांडपाण्याचा शिरकाव
Published on
Updated on
बिबवेवाडी/महर्षीनगर : पुढारी वृत्तसेवा : गुलटेकडी परिसरातील डायस प्लॉट झोपडपट्टीमधील नागरिकांच्या घरांत गेले तीन दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी सांडपाणी शिरत आहे. यामुळे नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाणी घरात शिरल्याने दुर्गंधीमुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
महापालिका प्रशासनाच्या कामातील दिरंगाई, तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे व्यवस्थित न झाल्यामुळे नागरिकांना सतत विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डायस प्लॉट झोपडपट्टीमधील रहिवासी संगीता आढाव यांनी सांगितले की, महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे या समस्येबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. ड्रेनेज लाईन तुंबत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. घरात सांडपाणी शिरल्याने दुर्गंधी पसरली असून, आमचे आरोग्य धोक्यात आले आहे.
घरात स्वयंपाकही करता येत नाही. मुले दुर्गंधीमुळे घरात यायला  तयार नाहीत. माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले म्हणाले की, महापालिका अधिकार्‍यांनी झोपडपट्टीतील सांडपाणी वाहिन्या व स्वच्छतागृहांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्षात देऊन त्याचे काम व्यवस्थित करणे गरजेचे आहे. तसेच ठेकेदारांनी केलेल्या कामकाजाची व्यवस्थित पाहणी केल्यानंतरच त्यांनी बिले अदा केली पाहिजेत.

अनेक वर्षांपासून उद्भवतेय समस्या

डायस प्लॉट झोपडपट्टी परिसरातून ड्रेनज वहिनी गेली आहे.  ती तुंबल्याने परिसरातील सहा ते सात घरांच्या फरशांमधून पाणी बाहेर आले.  या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने घरांमध्ये पाणी साचले. रहिवाशांनी घरांतून पाणी बाहेर काढण्यासाठी कसोशीने  प्रयत्न केले. या भागात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनज तुंबण्याची समस्या उद्भवत असल्याचे नागरिकांनी सांगितले
आम्ही सकाळच्या वेळी कामाच्या घाईत असताना अचानक घरात सांडपाणी शिरल्याने काहीच सुचेनासे झाले. . गेल्या तीन दिवसांपासून सकाळी पाणी सुटताना व सायंकाळच्या वेळी ड्रेनेज तुंबल्याने घरात सांडपाणी शिरत आहेत. यामुळे आम्हाला कामावर जाता येत नाही.
-रेखा कदम, रहिवासी
महापालिकेने डायस प्लॉट, इंदिरानगर व गुलटेकडी भागातील झोपडपट्ट्यांमधील ड्रेनेज लाईन व स्वच्छतागृहांचीही देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या त्वरित
बदलण्यात याव्यात.
– गणेश शेरला, अध्यक्ष, एकता प्रतिष्ठान
शनिवारी सकाळी झोपडपट्टीतील तीन, चार घरांत व दोन गल्लीमध्ये सांडपाणी शिरल्याचे समजले आहे. त्या ठिकाणी तातडीने कर्मचारी पाठवून ड्रेनेज लाईनची सफाई करण्यात आली आहे.  ही समस्या  कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.
-राजेश फटाले, साहाय्यक अभियंता
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news