Crime News :भवानी पेठ का भाई हूं पुलिस भी मुझसे डरती है!

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लग्नास नकार दिला म्हणून सराईत गुन्हेगाराने तरुणीला तिच्या होणार्‍या नवर्‍याला जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर 'मै भवानी पेठ का भाई हूं मुझसे पुलिस भी डरती है' असे म्हणून तरुणीला अश्लील शिवीगाळ विनयभंग केला.
याप्रकरणी, 22 वर्षीय तरुणीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबन उर्फ अरबाज शेख (वय 23) विरुद्ध पोलिसांनी विनयभंग, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 5 डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भवानी पेठ परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी अरबाज एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. तरुणी मेंदी काढलेले पैसे घेण्यासाठी दुचाकीवरून निघाली होती. त्या वेळी आरोपीने त्याची दुचाकी तरुणीच्या दुचाकीला आडवी लावून 'तुझे मेरे साथ शादी करनी है' असे म्हणाला. त्याला तरुणीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने 'तेरी मंगणी जिसके साथ हुई ना मै उसको जान से मार दुंगा.

तब किसके साथ शादी करेगी?' त्यानंतर तरुणीला शिवीगाळ करत आपण भवानी पेठेचे भाई असून, पोलिससुद्धा मला भितात, तू काही करू शकत नाहीस असे म्हणून तरुणीला अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अरबाज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विटे करीत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news