12 shakti peeth : बालेवाडीत १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा | पुढारी

12 shakti peeth : बालेवाडीत १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा

औंध; पुढारी वृत्तसेवा : 12 shakti peeth : लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा अभूतपुर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजप सदस्य लहू बालवडकर यांच्या पुढाकाराने पुण्यातील बालेवाडी परिसरातील गेनबा सोपानराव मोझे कॉलेजच्या मैदानात भक्तांसाठी पादुका दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप सदस्य यांनी भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा अभूतपुर्व सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये प्राचिन श्री दत्ता सुवर्ण मूर्ती, श्री सायंदेव दत्तश्रेत्र कडगंची येथील श्री दत्त गुरू करुणा पादुका, श्री क्षेत्र औदुंबर येथिल श्री नृसिंह सरस्वती नारायण पादुका, श्री गुरू हैबतराव बाब यांनी नेर्लेकर घराण्याला दिलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका, श्री साई बाबा यांनी सन १८९८ साली निमोणकर घराण्याला दिलेल्या श्री साई बाबा पादुका, परम स्वामी भक्त श्रीमती सुंदराबाई काडगावकर यांना महाराजांनी सन १८६६ साली दिलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज पादुका, कै. भगवानराव जानराव देशमुख यांना श्री गजानन महाराज यांनि सन १९०७ साली दिलेल्या श्री गजानन महाराज पादुका, श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड सावरगाव बीड येथील संजीवनी समाधी श्री मच्छिंद्रनात महाराज पादुका, समर्थ भक्त मोहन बुवा रामदासी, खादगाव यांचे घराण्यातील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रासादिक श्री समर्थ रामदास स्वामी पादुका, श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज श्री परमहंस परिव्राजताचार्य पादुका, प.पु. रधुनाथ हरिभाऊ कडलासकर (पेंटर काक) यांना सन १९४६ साली शंकर महाराजांनी दिलेल्या प्रासादिक श्री शंकर महाराज पादुका आणि संस्थापक आचार्य-आंतरराष्टीय कृष्णभवनामृत संघ भक्तिवेंदांत स्वामी प्रभुपाद कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद ए. सी. पादुका या १२ पादुकांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, लहू बालवडकर यांनी दोन वर्षापुर्वी अशाच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला होता. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम कोविड काळानंतर प्रथमच आपल्या व आपल्या परिवारासाठी योग्य आला आहे. विशेषत ज्या वृद्ध लोकांना येवढ्या लांब जाऊन दर्शन करता येत नाही त्याच्यासाठी आयोजित करण्यात आला असून जास्तीत जास्त भाविकांनी भक्ती-भावाने दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लहू बालवडकर यांनी केले आहे.

Back to top button