तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे

तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे
Published on
Updated on

पुणे : दुकानांवरील इंग्रजी नामफलक, पाट्या हटवून मराठी पाट्यांसाठी आंदोलन करून तोडफोड केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी डेक्कन आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, कुलदीप यादव, श्याम ताठे, प्रवीण मिसाळ, संदीप माने, प्रवीण सोनवणे, राजेंद्र वागस्कर, दादा साठे, योगेश खडके यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत शाही भोज हॉटेलचे मालक व्येनाराम मनारामजी देवासी यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील शाही भोज हॉटेलच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. इंग्रजी पाटीची तोडफोड केली, तसेच जंगली महाराज रस्त्यावरील लेव्हीज शोरूम, शुभम टाइम्स, बुट्टे पाटील ग्रुपने लावलेल्या इंग्रजी पाट्यांची तोडफोड केली.

सहायक पोलिस निरीक्षक वर्षा शिंदे तपास करत आहेत. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इंग्रजी पाटीची तोडफोड केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी साईनाथ बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वर्नेन्दु घोष यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर तपास करत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news