पुणे सदाशिव पेठ : रंगावलीतून स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांना आदरांजली | पुढारी

पुणे सदाशिव पेठ : रंगावलीतून स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांना आदरांजली

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे सदाशिव पेठ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यंदा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना रंगावलीतून अभिवादन करण्याचा उपक्रम पुण्यातील सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम सार्वजनिक गणेश मंडळाने हाती घेतला आहे.

आजपासून (मंगळवार) त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत मंडळाच्या गणपती मंदिरासमोर स्वातंत्र्यलढ्यातील रोज दोन नेत्यांची चित्रे साकारली जाणार आहेत.

पुणे सदाशिव पेठ

पुणे सदाशिव पेठ : स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी महात्मा गांधी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची चित्रे

 

स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी महात्मा गांधी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची चित्रे रांगोळीतून रेखाटून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू यांची चित्रे रांगोळीतून रेखाटण्यात येणार आहे.

पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती दिवशी सुरेख रांगोळी

दिनांक १९ नोव्हेंबर रोजी स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची जयंती आहे. त्यांचेही चित्र रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितली.

पुणे सदाशिव पेठ

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी निधन झाले. त्यादिवशीच मंडळाने रंगावलीतून त्यांना आदरांजली अर्पण केली.

 

Back to top button