खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ दोन घरफोड्या, लाखोचा ऐवज चोरीला | पुढारी

खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ दोन घरफोड्या, लाखोचा ऐवज चोरीला

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा

खेड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. राजगुरुनगर शहरातील घरफोडीची घटना ताजी असताना चांदुस ( ता. खेड ) येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या दोन लाख ९३ हजाराचे सोने-चांदीचे दागिने लांबविले आहेत. याबाबत साधना अंकुश कारले ( रा. चांदूस ता. खेड) यांनी सोमवारी (दि १५) खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१४ रोजी सकाळी १०ते ५ वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला आहे. चांदूस येथे फिर्यादीचे दीर नारायण मोहन कारले यांचे घराचा पाठीमागील दरवाजाचे कुलुप अज्ञात चोरट्याने तोडले.चोरट्यांनी नारायण कारले यांच्या घरात प्रवेश करुन घराचे आतील भिंतीवरून फिर्यादी साधना कारले यांच्या घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा व आतील लॉकर उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले २ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपयांची रोख रक्कम असा दोन लाख ९३ हजाराचा ऐवज चोरून नेला.

आठ दिवसांपूर्वी राजगुरूनगर शहरातील स्वप्नील शिवाजी चौधरी यांच्या फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोंयडा तोडून फ्लॅटमधील सुमारे ४ लाख६७ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविले हाेते.

तसेच दोन दिवसांपूर्वी राजगुरुनगर येथे इंदु विलास सातकर या जेष्ठ महिलेची दोन भामट्यांनी दिशाभुल करून ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले हाेते. तसेच शेतकऱ्याचे कृषी पंप दुचाकी चोरी, मोबाईल चोऱ्या व कंपन्यातील मालाची चोरी अशा चोरीच्या घटनांमुळ तालुक्‍यातील नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचलं का?

Back to top button