पुणे : राज्यातील बहुतांश शहरे गारठण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी संभाजीनगर, पुणे, नाशिक या शहरांचे किमान तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी होते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात 'मिधीली' नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर शहराचे किमान तापमान राज्यात सलग दुसर्या दिवशीही सर्वात कमी म्हणजे 13.2 अंशांवर खाली आले. त्या पाठोपाठ पुणे 14.4 , नाशिक 14.1, यवतमाळ 14 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. तर महाबळेश्वरचे किमान तापमान 14.9 अंशांवर होते. दोन ते तीन दिवसांनंतर देशात पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊन थंडी पुन्हा कमी होऊ शकते, असाही अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
हेही वाचा