पुणे : पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत, पुणेकरांनी यंदा 25 हजार 450 वाहनांची खरेदी केली आहे. यात 16 हजार 768 दुचाकी, तर 5 हजार 997 चारचाकींचा समावेश आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दि. 24 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ही वाहन खरेदीची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षी दि. 5 ते 26 ऑक्टोबर 2022 या कालावधीत 22 हजार 181 वाहनांची खरेदी झाली होती. यावरून यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक वाहनांची खरेदी पुण्यात झाली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या वाहनांची नोंद पुणे आरटीओत करण्यात आली आहे.