अजित पवारांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या महिलेचे समुपदेशन

अजित पवार

अजित पवार

बारामती; पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील एका महिलेने सोमवारी (दि. १५) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा इशारा दिला. परंतु, पोलिसांनी तिला त्यापासून रोखले आणि तिला ताब्यात घेवून समुपदेशन केले.

या महिलेने यापूर्वी समाजमाध्यमातून बारामतीत नगरपरिषदेच्या एका माजी पदाधिकाऱ्याविरोधात गंभीर तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणी तिने पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, या तक्रीरीची दखल घेतली गेली नसल्याने तिने हे पाऊल उचलले.

यात तिने सोमवारी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा इशारा दिला. परंतु, पोलिसांनी तिला रोखले. सकाळी दहाच्या सुमारास तिला ताब्यात घेण्यात आले.

या महिलेचे पोलीसांनी समुपदेशन करीत मतपरीवर्तन करण्यात आले आहे. यापुढे अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलणार नसल्याचे महिलेने लेखी निवेदन दिले आहे. महिलेने संबंधितप्रकरणी तिने यापूर्वी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या पोलिस ठाण्याला याबाबत तपास करण्यास कळविण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : आमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, म्हणून आम्ही संपात उतरलोय

Exit mobile version