किरण गोसावी याची आणखी एका महिला साथीदार अटकेत | पुढारी

किरण गोसावी याची आणखी एका महिला साथीदार अटकेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या किरण गोसावी याची साथीदार असलेल्या आणखी एका महिलेला लष्कर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. कुसुम गायकवाड असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे.

परदेशात नोकरीचे आमिष दाखवत गोसावी आणि कुसुम गायकवाड यांनी फिर्यादी तरुणाची १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याआधी एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी  फरासखाना पोलिसांनी किरण गोसावीला अटक केली आहे. त्याशिवाय त्याची साथीदार असलेल्या महिलेले मुंबई मधून अटक केली होती.

दुसऱ्या प्रकरणात किरण गोसावी आणि कुसुम गायकवाड यांनी तरुणाला नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली होती. लष्कर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसरी महिला साथीदार कुसुम गायकवाड हिला अटक करण्यात आली आहे.

परदेशातून पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्कर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यामुळे आर्यन खान ड्रग प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेला किरण गोसावीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच गोसावीवर भोसरी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button