पुणे : पुढारी वृत्तसेवा : पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत फायरिंग केल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळील घडला. चेतन वसंत पडवळ असे डिलिव्हरी बॉयला मारहाण करत फायरिंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये डिलिव्हरी बॉय चे काम करतात. मंगळवारी रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता.
पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा पोहोचवल्यानंतर दोघामध्ये याच कारणावरून वाद झाले. पडवळ याने रोहितला मारण केली. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र, राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण करत त्याच्या कारमधून एक पिस्टल काढून हवेत फायरिंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात जीवितास धोका निर्माण होईल असा प्रकार केल्याप्रकरणी कलम 308, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :