राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : पप्पू वाडेकर खून प्रकरणी दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. काल (दि. १३) पप्पू वाडेकर याचा खून करण्यात आले होता. राजगुरुनगर शहरालगत झालेल्या कुख्यात गुंडा पप्पू वाडेकरच्या खून प्रकरणातील दोन आरोपी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहेत. बंटी उर्फ विजय विठ्ठल जगदाळे, जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे अशी त्यांची नावे आहेत.
राजगुरुनगर शहरात वर्चस्व वादातून कुख्यात गुंड पप्पू उर्फ राहुल कल्याण वाडेकर याचा साेमवारी खून झाला होता.
अधिक वाचा :
वाडेकर याचे मिलिंद जगदाळे, मयूर जगदाळे, बंटी जगदाळे, सचिन पाटणे, मारुती थिगळे यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने पप्पू उर्फ राहुल वाडेकर याच्यावर होलेवाडी परिसरात पिस्तुलातून गोळी झाडली.
कोयत्याने वार आणि दगडाने चेहरा ठेचून त्याचा खून करून पळून गेले. वाडेकर याचा भाऊ अतुल यांनी खेड पोलिस ठाण्यात या सर्वांविरोधात फिर्याद नोंदविली होती.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना योग्य त्या सूचना केल्या. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधीकारी अनिल लंभाते यांचे मागदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते.
अधिक वाचा :
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथक हे राजगुरुनगर परीसरात तपास करत होते. दरम्यान पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गोपनीय माहिती मिळाली.
या गुन्हयातील आरोपी बंटी उर्फ विजय विठ्ठल जगदाळे हा गुन्हा केलेपासून राजगुरूनगरमध्येच आहे. तो पुण्यात पळून जाण्याच्या तयारीत आहे.तपास पथकाने सापळा रचून बंटी उर्फ विजय विठ्ठल जगदाळे यास राजगुरुनगर शहरातुन ताब्यात घेतले. त्याच्यासोबत जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे, यालाही पकडण्यात आले आहे.
अधिक वाचा :
बंटी उर्फ विजय जगदाळे याच्याकडे चौकशी केली असता, जितेंद्र गोपाळे हा देखील गुन्हात सामील असल्याचे उघड झालेआहे. घटनेनंतर जितेंद्र गोपाळे हा आरोपी तौफिक शेख व मयुर जगदाळे यांचेसह पळून गेला होता. बंटी उर्फ विजय विठ्ठल जगदाळे व जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे यांना खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पास पोलिस निरीक्षक सतीश गुरव करत आहेत.
अधिक वाचा :
पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते यांच्या मागदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सचिन काळे, नेताजी गंधारे, सहा फौजदार राजेंद्र थोरात, विक्रम तापकिर, ज्ञानेश्वर श्रीरसागर, जनार्धन शेळके, राजु मोमीन, दीपक साबळे, सचिन गायकवाड, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय जावळे यांनी ही कामगिरी केली.