पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे राज्य राखीव पोलिस बल हे देशाचे व राज्याचे कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या सर्व संकटांना आव्हान देण्यासाठी पुर्ण सक्षम बनविणे हे ध्येय व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणीकपणे व इमानदारीने पार पाडावे असे मत राज्य राखीव पोलिस बलचे विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे यांनी व्यक्त केले. नवप्रविष्ठ पोलिस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्र 64 मधील प्रशिक्षणार्थीचा दीक्षांत समारंभ बुधवारी राखीव पोलिस बल प्रशिक्षण केंद्र नानविज येथे पार पडला पडला. यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षणा दरम्यान मिळालेले ज्ञान व शिस्त सेवानिवृत्ती पर्यंत कायम ठेवावे.
तसेच पोलिस दलाचे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या प्रमाणे कर्तव्य करावे, असेही त्यांनी सांगितले. दिक्षांत संचलनाचे परेड कामांडर म्हणुन पोलिस शिपाई ऋषीकेश गोपालराव पेन्दोरकर यांनी नेतृत्व केले. आंतरवर्ग प्रशिक्षणामध्ये पोलिस शिपाई परमहंस रामराव चौके यांनी व बाह्यवर्ग प्रशिक्षणात पोलिस शिपाई रविंद्र सुरेश महाडीक यांनी प्रथम क्रमांक मिळवला. बेस्ट कॅडेट ऑफ द बॅच चा किताब पोलिस शिपाई परमहंस रामराव चौके यांनी मिळविला.
चाळीस हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण
आतापर्यंत या प्रशिक्षण केंद्रातून 40 हजार 250 पोलिस प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 1 ते 19 या गटातील 136 नवप्रविष्ठ शिपाई यांना नानविज येथील प्रशिक्षण केंद्रात 1 डिसेंबर 2022 पासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. 9 महिन्याच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्राच्या वतीने उपप्राचार्य बी. पी जाधव यांनी प्रमुख उपस्थिती आणि मान्यवरांचे आभार मानले.
हेही वाचा :