पिंपरी : दिव्यांगांना मदत न करता जात, धर्म नावाने सातत्याने राजकारण करणारे नालायक लोक आहेत. त्यांना नेहमीच जात व धर्म दिसत असतो. त्यांना दिव्यांगांचे दु:ख व अडचणी कशा दिसणार, असा संतप्त सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
चिंचवड येथे आयोजित दिव्यांगांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आ. कडू म्हणाले की, दोन्ही पाय नसलेल्या दिव्यांगास वर्गणी काढून सायकल घेऊन दिली. परिसरात गावामध्ये तब्बल 250 सायकलींची गरज असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात राज्य शासनाने केवळ 2 सायकली देता येतील असे कळविले. त्यावर तोडगा काढत माझ्या लग्नाचा खर्च कमी करून दिव्यांगांना 250 सायकलींचे वाटप केले. तेव्हापासून दिव्यांगांशी जोडलो गेल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कांदा निर्यातीस शुल्क लावायची गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरची व्यवस्था आता तुम्ही करून ठेवता. इतका नालायकपणा. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडले.
…म्हणून मी गुवाहटीला गेलो
तब्बल 40 वर्षे राज्यमंत्री होतो. मात्र, स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय होऊ शकले नाही. सत्तांतराच्या काळात एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले. त्यावेळेस भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही ही जा, असा निरोप दिला. दिव्यांग मंत्रालय करणार असाल तर, जाईन, असे मी स्पष्ट केले. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर गुवाहाटीला गेलो आणि देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय राज्यात स्थापन झाले. तिकडे गेल्याने 50 खोक्यामुळे खूप बदनामी झाली. या बदनामीपेक्षा दिव्यांग मंत्रालय झाल्याचा आनंद मोठा आहे, असा दावा आ. कडू यांनी केला.
'कांदा न खाल्ल्याने कोणी मरत नाही'
आम्ही शेतकर्यांच्या बाजूने आहोत. कांद्याचे भाव वाढले की, नागरिकांची ओरड सुरू होते. भाव कमी झाले की, का ते हस्तक्षेप करत नाहीत. दोनशे रूपये क्विटल मागे द्यायचे. एक हजार रूपये क्विंटलमागे शेतकर्यांचे नुकसान करायचे, हे बरोबर नाही. कांदा न खाल्याने कोणी मेले का. कोणी मरणार आहे का, भाव कमी होण्यास मीडिया ही तितकीच जबाबदार आहे, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले.
हेही वाचा :