नाशिक-पुणे महामार्गावर उभ्या बसला टेम्पो धडकला; बस चालक ठार

नाशिक-पुणे महामार्गावर उभ्या बसला टेम्पो धडकला; बस चालक ठार
Published on
Updated on

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे टायर पहाटेच्या सुमारास पंक्चर झाल्याने बसचालक पंक्चर काढण्यासाठी जॅक लावत होता. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोची बसला जोराची धडक बसली. यात बसचालक जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी (दि. १२) पहाटे ३.५५ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल नांदूरखंदरमाळ येथे घडला. मयूर आनंदा मुंढे (वय ४५, रा. दत्तचौक, सिडको, नाशिक) असे अपघातातील मयत बस चालकाचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलिस ठाण्यात बसवाहक संदीप नामदेव खोडे (रा. सातपूर, जि. नाशिक) यांनी खबर दिली आहे.

नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोची (एचआर ४७ ई ४०७८) ची टायर पंक्चर झालेल्या नंदूरबार-पुणे बसला (एमएच २० बीएल ४०९४) जोराची धडक बसली. या अपघातात पंक्चर काढत असलेले चालक मुंढे गंभीर जखमी झाले. वाहक खोडे यांनी नवापूर-पुणे बसचे चालक अरुण शेलार यांच्याशी संपर्क करत त्यांना अपघात घडल्याचे सांगत पाठीमागे बोलावून घेतले. शेलार हे बस घेऊन आल्यानंतर मुंढे यांना महामंडळाच्या बसमधून आळेफाटा येथील माउली हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news