“कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर” असे म्हणत पुणे अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता

“कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर” असे म्हणत पुणे अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता
Published on
Updated on

पुणे : आज पहाटे कोंढवा कौसर बाग येथे आगीची घटना घडली होती. यावेळी अग्निशमन दलाकडून कोंढवा बुद्रुक आणि कोंढवा खुर्द येथील फायरगाड्या प्रथम रवाना करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी एक छोटे गोडाउन आणि गॅरेज होते. आगीचे मोठे स्वरुप पाहता अतिरिक्त अग्निशमन वाहने ही दाखल झाली होती. दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे आग इतरञ न पसरता धोका टळला आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

या सर्व घटनेवेळी कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रातील जवान दशरथ माळवदकर यांचा आज 54 वा वाढदिवस असून ते अग्निशमन दलात गेली 22 वर्षे सेवा बजावत आहेत. ते आज सकाळच्या ड्युटीला जाताना कुटूंबीयांनी त्यांचे औक्षण करीत ड्युटीवर जाताना सुट्टी घेण्याचा आग्रह केला असता त्यांनी "कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर" असे म्हणत ते ड्युटीकरिता घराबाहेर पडले. कारण त्यांना कोंढवा येथील आगीची घटना समजली होती. आपण सुट्टी न घेता आगीच्या वर्दीवर जाणे हे त्यांनी गरजेचे समजून तत्परतेने ड्युटीवर जाऊन आपले कर्तव्य बजावले.

घटनास्थळी असलेले अग्निशमन अधिकारी समीर शेख, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे, कैलास शिंदे आणि इतर जवानांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. अग्निशमन दलाचे जवान नेहमीच आपल्या कर्तव्याला महत्व देत कामगिरी चोख बजावतात.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news