शाळेत मारल्याचा १६ वर्षानी घेतला बदला; रस्त्यात गाठून केली मारहाण - पुढारी

शाळेत मारल्याचा १६ वर्षानी घेतला बदला; रस्त्यात गाठून केली मारहाण

पुणे; पुढारी वृत्तसेवा

शाळेत असतानाच्‍या आठवणी नेहमीच लक्षात राहतात. तसेच शाळेत खालेला मारही डाेक्‍यात राहताे. यातूनच एक प्रकार घडला आहे. शाळेत असताना वर्गातील एक मुलगा त्‍याला खूप मारत हाेता. ही त्‍याने तब्‍बल १६ वर्षानंतर काढली. त्‍या मुलाला  रस्त्यात गाठून बेदम मारहाण करत त्‍याने शाळेतील मारहाणीचा बदला घेतला. हा प्रकार प्रकार पुण्यातील औंध परिसरात एम्स हाॅस्पिटल समाेर घडला.

याप्रकरणी चतृश्रृंगी पाेलिस ठाण्यात विकी शिरतर व त्याचा अनाेळखी मित्राविराेधात गुन्हा दाखल झाला आहे. याबााबत अमाेल अंकुश कांबळे (वय-३३,रा.पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे.

‘मला ओळखले का?’

२४ ऑक्टाेबर राेजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास अमाेल कांबळे हे घरी जात हाेते. त्यावेळी माेटारसायकलवर आलेल्या विकी शिरतर याने त्यांना थांबवले. मला ओळखले का, अशी विचारणा केली. त्यावेळी अमाेल याने तू आणि मी एका वर्गात शिक्षण घेत हाेते, असे म्हणाल्यानंतर, विकीने त्यास तू मला शाळेत असताना खूप मारत हाेता. आता सापडला तुला साेडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर कांबळे घरी गेले. यानंतर विकी शिरतर व त्याचा मित्र घरात शिरुन त्यांनी लाकडी बॅटने अमाेल यास डाेळ्यास, पाठीवर व हातावर मारहाण करुन जखमी केले. याबाबत चतृश्रृंगी पाेलिस तपास करत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button