पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कडक उन्हाचा चटका आणि अधूनमधून बरसणार्या पावसाच्या सरी अशा वातावरणामुळे फुलांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे फुलांची नासाडी होत आहे. परिणामी आवक घटल्याने फुले महागली आहेत. भाज्यांच्या दराच्या तुलनेत फुलांचे दर तिपटीने वाढले आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची सुरुवात झाली आहे. एकीकडे कडक उन्हाळा जाणवत असताना अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.
हे वातावरण फुलांच्या उत्पादनाला घातक आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत आहे. परिणामी फुलांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांच्या दरापेक्षा अधिक दर फुलांचे आहेत. बाजारात भाज्यांचे दर प्रतिकिलो 50 ते 60 रुपये तर झेंडूच्या फुलांचे दर 160 ते 200 रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे पूजा, लग्नसोहळे आदींसाठी आवश्यक फुले खरेदीसाठी नागरिकांच्या खिशाला चटका बसत आहे.
फुलांच्या वाढत्या दराचा अंदाज घेता, मावळातील बर्याच शेतकर्यांनी भाताच्या पिकाची रोपे काढून फुलांच्या पिकाची लागवड केली आहे. मावळातील एका शेतकर्यास फुलांच्या उत्पादनामधून पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांचा कल फुलांच्या उत्पादनाकडे वाढला आहे.
मावळ हे मुख्य ठिकाण आहे. उंड्री, राजगुरूनगर, मंचर आदी भागांमधून शहरातील फुलबाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते.
फुलांचे दर प्रतिकिलो (रुपये)
फुले घाऊक किरकोळ
झेंडू 60 ते 80 160-200
गुलाब (तुकडा) 200 350
गड्डी (20 फुले) 100 300
शेवंती 150 ते 160 200-220
अॅश्टर (4 गड्डी) 25 60
तुकडा 150 250-260
गुलछडी 60-80 150-160
हेही वाचा